sex racket 
नागपूर

नागपुरात पुन्हा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बेसा भागातील या प्रसिद्ध मॉलमध्ये होता अड्डा...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : शहरात सेक्‍स रॅकेटचे लोन झपाट्याने वाढत आहे. अनेक पॉश इमारती, उच्चभू वस्त्यांमधील कुंटणखाणे यापूर्वीही उजेडात आले आहेत. आता हे लोण पॉश मॉलपर्यंतही पोहोचले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारी के सरा सरा मॉलमधील स्पा ऍण्ड सलुनवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट उघडकीस आणले. येथून दलाल महिलेला अटक करीत पीडित तरुणीची सुटका करण्यात आली. 

मनिषा तुकाराम करडे ऊर्फ मुस्कान अरविंद भारती (31) रा. वायगांव घोटुर्ली, डब्ल्यूसीएल उमरेड असे अटकेतील महिलेचे नाव आहे. मनीषनगर परिसरातील जयंती नगरीतील के सेरासेरा या प्रसिद्ध शॉपींग मॉलमध्ये "गॉर्जियस ब्युटी सलुन' नावाने प्रतिष्ठान आहे. मुस्कान गेल्या अनेक दिवसांपासून सलुनच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवित असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. सलुनमध्ये फंटरला ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. 

स्पा, सलुनच्या नावाखाली देहविक्री 
पंटरने मुलीबाबत विचारणा करून मुस्कानसोबत सौदा निश्‍चित केला. मुस्कानने सलुनमध्येच मुलगी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. देह व्यवसायाबाबत खात्री होताच पंटरने पोलिसांना इशारा केला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेच धाड घालून दलाल मुस्कानला ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली. मुस्कानने पीडित मुलीला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलल्याचे चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करून मुस्कानला अटक केली. 

ट्रकमधून 18.70 लाखांचे हेयर ऑईल लंपास 
केरळच्या कन्नौर येथून निघालेल्या ट्रकमधील 18.70 लाखांचे हेयर ऑईल लंपास करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्लीम इब्राहीम असे आरोपीचे नाव आहे. 17 फेब्रुवारी रोजी आपल्या ट्रकमध्ये कन्नौर येथील हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीच्या गोदामातून माल भरून तो गुंमगावच्या गोदामात पोहोचवून देण्यासाठी निघाला. 20 फेब्रुवरीला दुपारी 12 वाजता तो गुमगावच्या गोदामात पोहोचला. गोदामातील कर्मचाऱ्यांला ट्रकला बांधलेले त्रिपाल फाटलेले दिसले. यामुळे शंकाही बळावली. त्याने तपासणी केली असता ट्रकमधील इंदुलेखा हेयर ऑईलचे एकूण 222 कार्टून गहाळ दिसले. हा मुद्देमाल एकूण 18 लाख 70 हजार 128 रुपये किमतीचा आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी विश्‍वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates Live: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

SCROLL FOR NEXT