shankarbaba papadkar daughter marriage held on today in nagpur 
नागपूर

आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं, गृहमंत्र्यांच्या मानस कन्येचा आज विवाह

राजेश चरपे

नागपूर : समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या वर्षा आणि अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह सोहळा आज (रविवारी ता. २०) सायंकाळी पाच वाजता पोलिस लाइन टाकळी येथील सद्‍भावना लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख व पत्नी आरती देशमुख हे मुलीचे कन्यादान करणार असून नवरा मुलगा समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. मतिमंद व मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा यांना २३ वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत वर्षा आढळली होती. सहा वर्षांची झाल्यानंतर शिक्षणासाठी संत गाडगेबाबा निवासी मूकबधिर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. दुसरीकडे डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षांच्या समीरला शंकरबाबा यांनी स्वत:चे नाव देऊन सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. 

गृहमंत्री देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल देशमुख म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT