sharad pawar visit shankar baba ashram communicate with children achalpur Sakal
नागपूर

Sharad Pawar : शंकरबाबांच्या आश्रमाला आलो हे माझे भाग्यच; शरद पवार

शरद पवार दिव्‍यांग बालकांशी संवाद साधताना झाले भावनिक

राज इंगळे

अचलपूर : शारीरिक कमतरता असणाऱ्या दिव्‍यांग बालकांना उभे करणे हे मोठे काम आहे. ते काम वझ्झर येथील शंकरबाबांच्या आश्रमात केले जाते, असे गौरवोद्‍गार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या आश्रमाला दिलेल्या भेटीदरम्यान काढले.

पवार यांनी आज गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) आश्रमाला भेट दिली. आश्रमातील बालगृहातील बालकांशी संवाद साधताना शरद पवार भावनिक झाले होते. शंकरबाबांच्या या आश्रमाला भेट देता आली हे मी माझे भाग्य समजतो, असा भावपूर्ण संदेश शरद पवार यांनी शंकरबाबांच्या आश्रमातील संदेशपुस्तिकेत यावेळी नमूद केला.

संत गाडगेबाबांचे पाईक आणि अनाथांचे नाथ म्हणून ओळख असलेले शंकरबाबा पापळकर यांच्या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील आश्रमास शरद पवार यांनी भेट द्यावी, अशी अनेक दिवसांपासून माजी मंत्री अनिल देशमुख यांची इच्छा होती, परंतु योग जुळून येत नव्हता.

दरम्यान, विविध कार्यक्रमांसाठी शरद पवार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने योग जुळून आला अन् अनिल देशमुख यांची इच्छा शरद पवार यांनी शंकरबाबांच्या आश्रमास भेट देऊन पूर्ण केली.

गुरुवारी (ता.२८) सकाळी १०.४५ वाजता श्री. पवार वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात पोहोचताच शासनाच्या वतीने अचलपूरचे तहसीलदार संजय गरकल यांनी त्यांचे स्वागत केले, तर आश्रमाच्या वतीने शंकरबाबा यांच्यासह येथील दिव्यांग मुलांनी शरद पवार यांचे स्वागत केले. जवळपास ४५ मिनिटे शरद पवार आश्रमात थांबले होते. यावेळी त्यांनी आश्रमाचे संपूर्ण कार्य व माहिती शंकरबाबांकडून जाणून घेतली.

भेटीनंतर शद पवार परत जाण्यासाठी वाहनांच्या दिशेने निघाले असता आश्रमातील गांधारी आणि म्हाला, या दोन्ही दृष्टीहीन मुलींनी पवार यांचा हात पकडून त्यांना वाहनापर्यंत वाट मोकळी करून दिली. शरद पवार हेसुद्धा तेवढ्याच आपुलकीने गांधारी आणि म्हालाचे बोट पकडून वाहनापर्यंत चालत गेले.

अनाथ बालकांना १८ वर्षांनंतर संस्थांमध्ये ठेवता येत नाही मग ही गतिमंद, अंध, अनाथ मुले कुठे जातील? त्यामुळे १८ वर्षांवरील अनाथांच्या आजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा, यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी भावनिक साद शंकरबाबा पापळकर यांनी शरद पवार यांना घातली.

शंकरबाबांची लेक रूपावर मागील पाच-सहा महिन्यांपासून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे, त्यामुळे बाबांनी रूपाच्या प्रकृतीची चिंता पवार यांच्यासमोर व्यक्त केली, त्यावर पवार यांनी मुंबईत रूपाच्या उपचाराची ग्वाही दिली.

यासोबतच कोणतीही मदत लागली, तर निसंकोच सांगा... ती नक्की केली जाईल, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी शंकरबाबांना दिली. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

आणि शरद पवारांचे डोळे पाणावले

दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असलेल्या गांधारीने शरद पवार यांच्यासमोर ‘ऐ मेरे वतनके लोगो, जरा आंख मे भर लो पानी, जो शहीद हुये उनकी, जरा याद करो कुर्बानी’, हे देशभक्ती गीत गायले. यावेळी उपस्थितांसह शरद पवार यांचे डोळे पाणावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT