cyber crime  sakal media
नागपूर

Nagpur : सायबर गुन्हेगारांचा ‘शेअर्स ट्रेडिंग’चा फंडा

३० दिवसांत रक्कम दुप्पटचे आमिष; नागरिकांनी सावध राहावे

अनिल कांबळे @anilkambleSakal

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर शेअर्स मार्केटमधील चढ-उताराचा फायदा घेऊन ट्रेडिंगच्या नावावर ३० दिवसांत दुप्पट पैसे कमावण्याची संधी असल्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार नवा फंडा वापरत आहे. या फंड्याला अनेक जण बळी पडले असून, लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अनेकांना शेअर्स मार्केटबाबत पुरेशी माहिती नसते. शेअर्स मार्केटमधील चढ-उतारावर लाखोंचे नुकसान किंवा फायदा झाल्याचे ऐकिवात असते. थोड्याफार माहितीच्या आधारे अनेक जण शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक असतात. परंतु, पैसा कुठे गुंतवावा, कसा गुंतवावा, त्याचा परतावा कसा मिळवावा आणि पैसे न बुडण्यासाठी काय खबरदारी घ्यावी आदीबाबत माहिती नसल्याने अनेक जण पैसे असूनही गुंतवणूक करीत नाहीत. अनेकदा गुगलवर ‘हाऊ टू इन्व्हेस्ट मनी इन शेअर मार्केट’ असे सर्च करतात. तेवढ्याच आधाराचा अनेक सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात. गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांना मॅसेज, फोन, लिंक, ई-मेल करून संपर्क साधतात. सोशल मीडियावरील अकाउंटवरही वारंवार मॅसेज पाठवून ‘हॅमरिंग’ करतात. ‘दिवाळीत शेअर्स मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत आहे, त्यामुळे एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास ३० दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त रक्कम कमावण्याची संधी आहे.’ अशी गोडीगुलाबी लावतात.

असे पडतात बळी

शेअर्स मार्केटचे पूर्ण अभ्यासक असल्याचे सायबर गुन्हेगार सांगतात. विश्‍वास संपादन करण्यासाठी काही व्यक्तींना किती फायदा झाला याचे स्क्रीन शॉट पाठवितात. चोवीस तासांत गुंतवणूक केल्यास किती फायदा होऊ शकतो, याबाबत मन वळवून जाळ्यात ओढतात.

शेअर्स मार्केटमध्ये रोबोटची थाप

सायबर गुन्हेगार आभासी पद्धतीने आपल्या गुंतवणुकीच्या रकमेचे ॲपद्वारे फेक अकाउंट तयार करतात. यावर रोबोटिक पद्धतीने लोकांचा कसा जास्तीत जास्त फायदा करून दिला व देऊ शकतो त्याची खात्री करून देण्यासाठी ते 'बोलबच्चन' देतात. यासाठी ते स्वतः तयार केलेल्या ॲपमध्ये आपली गुंतवणूक केलेली रक्कम दाखवितात. चोवीस तासांत जवळपास दुप्पट रक्कम फेक अकाउंटमध्ये जमा झाल्याचे दाखवतात. त्यानंतर आणखी काही पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. परंतु, काही दिवसांतच ॲप बंद पडते आणि पैसेही दिसत नाही.

"शेअर्स ट्रेडिंग आणि शेअर्स मार्केटच्या नावावर फोन किंवा लिंक आल्यास सावध राहा. आपल्याला मॅसेज पाठविणाऱ्याची कोणती कंपनी आहे? ती कंपनी कुठे रजिस्टर आहे? तिचे कार्यालय कुठे आहे? यांची प्रत्यक्ष खात्री होत नसल्यास थांबा. खात्री असल्याशिवाय कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका. जर कुणी दुप्पट रक्कम कमविण्याचे आमिष दाखविल्यास अशा आमिषाला बळी पडू नका. कुणीही फसवणूक केल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा."

-केशव वाघ, सायबर क्राईम, नागपूर पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT