Sheikh Hussain Abdul Jabbar, the former president of the Congress and the then president of the trust, was arrested in connection with the financial scam esakal
नागपूर

काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना अटक; कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

रुपेश नामदास

नागपूर: उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये एक कोटी ५९ लाख ५२ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) यांच्यासह माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी यांना रविवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

पोलिसानी त्यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळविली. या प्रकरणात सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांना अटक

शेख हुसेन हे १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ट्रस्टचे अध्यक्ष होते. पदावर असताना दोघांनी ऑडिट न करता पाच वर्षांत एक कोटी ५९ हजार रुपयांचा अपहार केला. या दोघांचा कालावधी संपल्यानंतर ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४, रा. निराला सोसायटी, मोठा ताजबाग) यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

त्यांनी ऑडिट करवून घेतले असता त्यात दीड कोटी रुपयांची हेरफेर असल्याची माहिती समोर आली. त्यातून २२ सप्टेंबर २०२२ ला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा समोर आला. सय्यद यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी शेख हुसेन व माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे, शेख हुसेन व वेलजी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला होता.

त्यानंतर त्यांनी सर्वोच्य न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तोही फेटाळल्यानंतर त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज ते सादर होताच, त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत सत्र न्यायालयातून बुधवारपर्यंत पोलिस कोठडी मिळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT