nagpur municipal corporation  sakal media
नागपूर

नागपूरात शिवसेना, राष्ट्रवादीची बंडखोरांवर नजर

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पूर्ण मदार काँग्रेस आणि भाजपच्या बंडखोरांवर राहणार आहे.

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पूर्ण मदार काँग्रेस आणि भाजपच्या बंडखोरांवर राहणार आहे. याकरिता आतापासूनच बंडाच्या पावित्र्यात असलेल्यांवर दोन्ही पक्षांनी नजर रोखून ठेवली आहे. दुसरीकडे भाजपचा बैठकांवर जोर असून काँग्रेस डिजिटल नोंदणीच्या मागे लागली आहे. महापालिकेतील दीडशे जागा लढवायला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे सक्षम कार्यकर्ते नाहीत. यापूर्वीसुद्धा संधी मिळाल्यानंतरही दोघांनाही संपूर्ण शहरात उमेदवार सापडले नव्हते. यावेळी काँग्रेसच्या धोरणामुळे राष्ट्रवादीला एकट्याच्या बळावर निवडणूक लढवायची असल्याचे आधीच कल्पना आहे. अलीकडेच पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी आघाडीसाठी कोणाच्या दरावर जाऊन पाया पडण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यांचा थेट रोख काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होते.

बैठकांना भाजप कार्यकर्ता वैतागला

महापालिकेच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक मागणीच्या भाजपकडे आहे. मात्र शहर, मंडळ, प्रभाग आणि त्यानंतर सातत्याने होणाऱ्या बूथ बैठकांमुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच वैतागले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने सर्वच इच्छुकांना गुंतवून ठेवले आहे. पक्षाच्या दृष्टीने ही बाब चांगली असले तरी उमेदवारी नको पण बैठका आवरा अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

शिवसेना कोमात

शिवसेना संघटनस्तरावर सध्या कोमात गेल्याचे चित्र आहे. कोणीतरी पक्षात प्रवेश करतो एवढीच काहीतरी हालचाल सुरू असते. संघटनास्तरावर कुठलाही कार्यक्रम शिवसेनेचा सध्या सुरू नाही. अनेकजण तर आपण महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर बोलू असे सांगत आहेत. त्यामुळे एकमेकांचा गेम करण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी तलवारीला धार लावून बसले आहे अशी शंका येते.

काँग्रेस कमबॅक कशी करणार?

काँग्रेसला महापालिकेत कमबॅक करायचे आहे. या संदर्भात नुकतीच ऐक बैठक प्रदेशाध्यक्षांनी बोलावली होती. त्यात आतापासूनच सक्षम उमेदवार शोधून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत तिकिटाची श्वाश्वती देत नसल्याने सर्वच इच्छुक गॅसवर आहेत. विकास ठाकरे यांना चालणारा उमेदवार पालकमंत्री नितीन राऊत यांना चालणार का असा प्रश्न येथे आहे. त्यामुळे सध्या डिजिटल सदस्य नोंदणी याच कार्यक्रमावर सर्वांचा भर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT