Sanjay Raut  sakal
नागपूर

शिवसेनेच्या बैठका व भेटीगाठी रविभवनात! संजय राऊत नागपुरात

आजी-माजी शिवसैनिकांच्या भेटीसुद्धा रविभवन येथेच घेणार

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेच्या बैठका व भेटीगाठी रविभवनात! संजय राऊत नागपुरात

आजी-माजी शिवसैनिकांच्या भेटीसुद्धा रविभवन येथेच घेणार

Shiv Sena Ravi Bhavana Sanjay Raut Nagpur meetings

राजेश चरपे

नागपूर : शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातील भेटीगाठींचा कार्यक्रम रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रविभवन येथे घेण्याचे ठरविले आहे. राऊतांचा हा पवित्रा संपर्क प्रमुखांना एकप्रकारचे धक्का असल्याचे मानला जाते.गणेशपेठ येथील शिवसेना भवन सोडून सर्व बैठका संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच कार्यालयात घेतल्या जात असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप करण्यात येत होता. याची तक्रार मुंबईतील नेत्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर सर्व महत्त्वाच्या बैठका आणि स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेना भवनचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नव्हती.

वर्षभरात बोटावर मोजण्याइतक्या बैठका शिवसेना भवन येथे पार पडल्या. संजय राऊत यांचा कार्यक्रम आखताना महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांच्याकडे असलेल्या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातच बैठका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नाराजीचा सुरू उमटू लागला होता. तो संजय राऊत यांच्या कानावर टाकण्यात आला. त्यामुळे त्यांनी संपर्क प्रमुखांच्या घरी भोजन आणि कार्यालयाला भेट हा कार्यक्रम कायम ठेवला. बैठका मात्र रविभवनच्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आजी-माजींमध्ये संतुलनाचा प्रयत्न

आजी-माजी शिवसैनिकांच्या भेटीसुद्धा ते रविभवन येथेच घेणार आहेत. तसा सुधारित दौराही जाहीर करण्यात आला आहे. भोजन संपर्क प्रमुखांच्या घरी आणि बैठका रविभवन येथे ठेवून संजय राऊत यांनी जुन्या-नव्या शिवसैनिकांमध्ये समतोल साधला आहे. संजय राऊत यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, खासदार संजय शेवाळे, खासदार प्रियांका चतुर्वेदी हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊत यांचे सोमवारी रात्री शहरात आगमन झाले. मंगळवारी साडेअकरा वाजता ते प्रेस क्लब येथे पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. दीड वाजता संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी भोजन, तीन वाजता महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, चार वाजता प्रमोद मानमोडे यांच्यासोबत भेट व चर्चा. पाच वाजता आजी-माजी शिवसैनिकांसोबत चर्चा. बुधवारी (ता.२३) नागपूर ग्रामीणचा दौरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT