uddhav thackeray 
नागपूर

अदानीला प्रश्न विचारला अन् चमचे वाजले! उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

सलीम कुत्ता प्रकरणावरुन विधान भवनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर बोलताना सरकारवर घणाघात केला आहे.

कार्तिक पुजारी

नागपूर- सलीम कुत्ता प्रकरणावरुन विधान भवनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर बोलताना सरकारवर घणाघात केला. तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. कोणाच्याही मनात आलं म्हणून कारवाई केली जात आहे. आमच्याकडे पुरावे असून देखील एसआयटी स्थापन का केली जात नाही? भाजपचा निर्लज्ज कारभार सुरुयं, अशी टीका ठाकरेंनी केली.

नागपूरच्या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे. अधिवेशनाची सुरुवात नबाव मलिक यांच्या मुद्द्याने झाली. आम्हाला उपमुख्यमंत्र्यांबाबत अभिमान वाटू लागला होता. आम्ही पत्र लिहिलं इक्बाल मिर्ची, प्रफुल्ल पटेल यांचं काय म्हणून विचारणा केली. पण, आम्हाला अद्याप उत्तर मिळालं नाही, असं ठाकरे म्हणाले.

राज्य कोण चालवतंय हे कळत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आमच्यावर आरोप करण्यात आले. आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे आम्ही शेण खाल्लं असेल तर तुम्ही देखील तेच खाताय. खरं कोण खोटं कोण होऊन जाऊद्या. कर नाही तर डर कशाला. एसआयटी लावा. आमचे मंत्री ज्याच्या लग्नाला गेले होते तो देशद्रोही नाही हे जाहीर करुन टाका, असा निशाणा ठाकरे यांनी साधला.

लग्नाला पोलीस अधिकारी देखील होते. त्यांच्यावर कारवाई झाली. मग कोणी मंत्री होते का याची चौकशी तरी करा, आधीच काय जाहीर करताय, असा सवाल ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंवर टीका

धारावी येथे मोर्चा काढण्याच्या मुद्द्यावरुनही ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मला आता कळायला लागलंय अदानीचे चमचे कोण-कोण आहेत. आम्ही अदानीला प्रश्न विचारला तर चमचे का वाजत आहेत! आंदोलन केल्यावर विषय काय हे विचारुन बोलतात. त्यामुळे अर्धवट माहितीवरुन कोणी प्रश्न विचारु नये. तसेच विमानाला टोल लागत नाही. शालीचं वजन पेलतंय का नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, असा टोमणा त्यांनी मारला.

धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. कोणत्याही परिस्थिती धाराविकरांचा विकास आम्हाला हवा आहे. याबाबत सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा अशी आमची इच्छा होती, असं ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. मोदी आता गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेवावं असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT