file 
नागपूर

धक्‍कादायक ! ‘या’ तालुक्यातील मृतांचा आकडा ३४, पन्नास वर्षांवरील२१ जणांनी गमाविले प्राण…

सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर) : तालुक्यात दिवसेंदिवस बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. १७ जुलैपासून सतत एकामागे एक ३४ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी कायमच आहे. पाहता पाहता तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊशेच्या घरात गेली. मागील एक आठवड्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. पंचायत समितीच्या उपसभापतींसह तब्बल ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यात ग्रामीण भागातील १८ रुग्ण असून यात सर्वाधिक येरखेडा येथील दहा, गुमथळा सहा तर रणाळा व गुमथी येथील प्रत्येकी एक तर छावणी परिषद क्षेत्रातील सहा तसेच शहरातील विविध भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.

अधिक वाचा  : ...आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी फेकली शेतकऱ्यांची कर्जासाठीची कागदपत्रे!

मृतांच्या संख्येवर आळा घालण्यात अपयश
आज मृत झालेल्यांमध्ये जयभीम चौक येथील ५८ वर्षीय पुरुष, फुटणा ओली येथील ८० वर्षीय पुरुष तर दाल ओली येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. कामठी पंचायत समितीच्या उपसभापतींना आज बरे वाटत नसल्याने शंका दूर करण्याच्या उद्देशाने केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट केली.त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळल्या. मात्र यांना कुठलेही लक्षण नसल्याने लाईफ लाईन हॉस्पिटल येथून उपचारार्थ औषधीपुरवठा करीत बिडगाव येथील स्वगृही गृहविलगीकरण करण्यात आले. यावेळी सभापतींनी स्वतःची चाचणी केली असता त्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनासह सारीच्या आजाराने हातपाय पसरल्यामुळे मृतांची संख्या जलद गतीने वाढत आहे. मागील १७ जुलैपासून अवघ्या वीस दिवसांत १६ महिला व १८ पुरुष असे सतत एकामागे एक ३४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहरातील विविध भागातील तेविस, ग्रामीण भागातील दहा यात सर्वाधिक येरखेडा येथील पाच आहेत. छावणी परिषद क्षेत्रातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील २१ व्यक्ती पन्नास वर्षांवरील आहेत. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९७ वर पोहोचली आहे. त्यातील ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३९५ रुग्ण अॅक्टिव आहेत तर आज रॅपिड अँटीजेन चाचणी केलेल्या अनेकांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे.

अधिक वाचा : मुलीचे लग्न मुलाच्या घरी ‘मेसेज’ पाठवून तोडले, म्हणून जन्मदात्रीने उचलले टोकाचे पाऊल....

खासगी डॉक्टर झाले भयभीत, रुग्णांची उपचारासाठी भटकंती
कोरोनाच्या महामारीने सर्वत्र खळबळ माजविली असून आता कोविड योद्धा समजल्या जाणाऱ्या खासगी डॉक्टरांना सुद्धा कोरोनाची भीती वाटत आहे. काही डॉक्टरानी दवाखाने तर सुरू ठेवले, मात्र उपस्थित राहत नाही तर काहींनी दवाखाने बंद ठेवणे योग्य समजल्याने मात्र रुग्णांना गैरसोय होत आहे. मागील वर्षीच्या शेवटी कोविड-१९ मुळे तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत भर पडत असल्याने नागरिकांत भीती तर आहेच, आता मागील महिन्यापासून येथील खासगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा पुरविणे बंद केल्याने आता रुग्णांना भटकावे लागत आहे. येथे जवळपास तालुक्यात लहान मोठे रुग्णालय आहेत. याची नोंद तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे आहेत. या डॉक्टरवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याची आहेत. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी अश्विनी फुलकर दरम्यान कोणत्याही नागरिकांच्या अडचणीकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. येथे मोठे प्रमुख २० ते २५ दवाखाने शहरात आहेत, तर ३५ ते ४९ लहान दवाखाने आहेत. या खासगी रुग्णालये कर्मचाऱ्याच्या भरवश्यावर चालविण्यात येत आहेत. जर कुणाला मोठा त्रास असला तर त्यांना या मोठ्या दवाखान्यात पुढील तारखा रुग्णांना देण्यात येत आहेत. अश्या परिस्थितीत या रुग्णांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न रुग्णाला पडत आहे.

अधिक वाचा  : नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागात फोफावतोय कोरोना, ही आहेत त्यामागची कारणे...

कामठीतील दोन रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कामठी तालुक्यात चांगलाच पसरला असून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज आहे. मात्र कोरोना विषाणूंची सर्वसामान्य नागरिकांत चांगलीच भीती पसरल्याने बहुतांश नागरिक हे कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी बहुधा नागरिक हे या कोरोना विषाणूला बळी पडल्याने आजपर्यंत ३४ व्यक्ती दगावले आहेत. तेव्हा हा मृत्यूदर कमी व्हावा, या मुख्य उद्देशाने कोरोना विषाणूचे वेळीच निदान होऊन, त्यावर उपचार व्हावा या मुख्य उद्देशाने कामठी तालुक्यात आजपासून दोन खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कामठी कळमना रोडवरील लाईफ लाईन हॉस्पिटल तसेच आयुष्यमान हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. लवकरच सिटी हॉस्पिटलची सुद्धा निवड करण्यात येणार आहे.

जनतेला आवाहन
कोरोना विषाणूचे लक्षणे नसल्यास वा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णाला घरीच उपचार घेता येईल तसेच लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सर्वसाधारणपणे नागपूरच्या मेयो मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात येते. त्यातही नागपूर च्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णांना आता कामठी शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल, आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येणार आहे. सर्व खासगी रुग्णालयांना शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार उपचार खर्च येणार आहे. त्यामुळे आता कोरोनाची भीती मनात न बाळगता स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबीय सुरक्षिततेसाठी कोरोनाची कुठलेही लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी तपासणी करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.  


संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT