Signs of "Lockdown" again in Nagpur, read what Commissioner Mundhe said? 
नागपूर

नागपुरात पुन्हा "लॉकडाऊन'चे संकेत, वाचा काय म्हणाले आयुक्त मुंढे?

राजेश प्रायकर

नागपूर : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरू झालेल्या "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु नागरिकांकडून लॉकडाऊनसंदर्भातील निर्देश, सूचनांचे पालन होत नसल्याने गेल्या काही दिवसांत शहरात झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. नागरिक असेच बेफिकिर राहीले तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. 


नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर आज शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, गेल्या चार महिन्यात रुग्णांची संख्या 1789 इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्‌याने वाढली.

1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत "मिशन बिगीन अगेन' सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. मात्र, महानगरपालिकेच्या निर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे.

खासगी किंवा शासकीय कार्यालयात 15 व्यक्ती किंवा 15 टक्‍के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. दुकाने सुरु करण्यासंदर्भातील तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळले जात नाही. अनेक जण विनाकारण शहरात बिनधास्त फिरत आहे.

दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढली. नागरिकांनी नियम पाळले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दिशानिर्देशांचे पालन करा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. 

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल 
लॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर सोमवारपासून मनपा आणि पोलिस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर "वॉच' ठेवणार आहे. नियम तोडणारे आढळल्यास मनपा आणि पोलिस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी माहिती द्यावी. नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त मुंढे यांनी दिला आहे. 

मध्यवर्ती कारागृह नवा "हॉटस्पॉट' 
मध्यवर्ती कारागृहातील 500 कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 300 कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे 1200 जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्‍यता आहे. मध्यवर्ती कारागृह आता नवे "हॉटस्पॉट' झाले आहे. असे हॉटस्पॉट टाळण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT