ARM Machine Shade eSakal
नागपूर

ARM Machine Shade : आता एआरएम मशिनच्या शेडसाठी देखील मिळणार सरासरी ५० टक्के अनुदान! महाराष्ट्र ठरलं पहिलंच राज्य

Silk ARM Machine : महाराष्ट्रात सातत्याने रेशीम शेतीचा विस्तार होत असून कोश उत्पादकताही वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उत्पादित कोशापासून धागा निर्मितीला राज्यात प्रोत्साहन दिले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Silk industry in Maharashtra : देशात पहिल्यांदाच रेशीम कोशापासून धागा निर्मितीकरीता असलेल्या ॲटोमॅटिक रेलिंग मशिन ठेवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडवरही अनुदान दिले जाणार आहे. शेडच्या आकारानुसार सरासरी ५० टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सातत्याने रेशीम शेतीचा विस्तार होत असून कोश उत्पादकताही वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उत्पादित कोशापासून धागा निर्मितीला राज्यात प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या राज्यात सहा ॲटोमॅटिक रेलिंग मशिन लावण्यात आल्या आहेत. त्यासोबतच येत्या काळात नव्याने पाच उद्योगांना मान्यता देण्यात आली आहे. राज्याची कोश उत्पादकता पाहता २० उद्योग चालतील, असा अंदाज आहे. (Silk Industry Subsidy)

एका मशिनची किंमत सरासरी एक कोटी ४९ लाख रुपये आहे. त्यावर केंद्र ५०, राज्य २५ याप्रमाणे ७५ टक्‍के अनुदान मिळते. उर्वरित २५ टक्‍के लाभार्थी हिस्सा राहतो. मशिन घेतल्यानंतर ती बसविण्यासाठीचे फाउंडेशन (पाया) आणि वरील शेड यावर सुमारे एक कोटी इतकाच सरासरी खर्च होतो. परिणामी या उद्योगाच्या उभारणीला मर्यादा आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता रेशीम संचलनालयाच्या वतीने शेडकरीता देखील अनुदान मिळावे असा प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता.

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील तसेच या खात्याचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी गंभीरतेने ही बाब घेत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या संबंधीचे प्रस्ताव जिल्हा रेशीम कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर ते मंजुरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अध्यक्ष रेशीम संचालक असून सदस्य सचिव रेशीम उपसंचालक आहेत. सदस्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता, केंद्रीय रेशीम विकास मंडळ बंगळूरचे प्रतिनिधी, उपसचिव (रेशीम) यांचा समावेश आहे.

ॲटोमॅटिक रेलिंग मशिनची संख्या वाढल्यास धागा निर्मिती आणि त्यातून रोजगार असे साध्य होईल. आता शेडसाठी अनुदान मिळाल्याने निश्चितच कोशापासून धागा निर्मिती करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. वस्त्रोद्योग खात्याचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला.

- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT