Six corona positive found in Nagpur city 
नागपूर

COVID-19 नागपूरसाठी धोक्याची घंटा, एका दिवशी एकाच कुटुंबातील सहा रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात रुग्ण कमी प्रमाणात होते. गुरुवारचा दिवसही नागपूरसाठी समाधान देऊन गेला होता. मात्र, सरणाऱ्या रात्रीने नागपूरकरांच्या चिंतेत भर घातली. सतरंजीपुरा येथे कोरोनाची लागण झाल्याने रविवारी एका मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी मध्यरात्री स्पष्ट झाले. यामुळे एकट्या नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विषाणू प्रयोगशाळेतील तिसऱ्या सत्रात सहाही जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले होते. त्यांचा अहवाल गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्राप्त झाला. या अहवालात सहाही जणांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळून आला. एकदम सहा जणांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. सतरंजीपुरा येथील मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने या सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळेच देशात लॉकडाउनही सुरू आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच आहेत. नागपुरात गुरुवारी एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर मोहीम हाती घेत उपाययोजनेला सुरुवात केली. याअंतर्गत सतरंजीपुरा भागातील रुग्णाच्या रहिवास क्षेत्रातील बडीमशीद आणि त्याला लागून असलेल्या मस्कासाथचा भाग सील केला आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन अल्पवयीनचा समावेश

सतरंजीपुरा येथील कोरोना रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांमध्ये आठ ते बारा वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुले, 22, 30, 34 व 35 वयोगटातील चौघांचा समावेश आहे. कोरोनाच्या चाचणीत सकारात्मक अहवाल आलेल्यांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे एकट्या नागपुरातील कोरोनाबाधित महिलांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.

युद्धपातळीवर शोध सुरू

नागपुरात एकाच दिवशी तब्बल सहा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या सहा रुग्णांमुळे रुग्णांची संख्या 19 वरून 25 वर जाऊन पोहोचली आहे. या सर्वांवर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 25 मधील आयसोलेसन वॉर्डात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने या सर्वांची रवानगी पेईंग वॉर्डातल्या साईड रुममध्ये करण्यात आली आहे. सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी आता युद्धपातळीवर शोधली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT