Six devotees died in a horrific accident after autorickshaw fell off a bridge in pusad Yavatmal  
नागपूर

पोहरादेवीची नवस फेडायला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात ६ जण ठार; चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंगळवारी सकाळी हे सर्व सोळा जण धुंदी येथील ज्ञानेश्वर गणेश राठोड याच्या तीन चाकी अ‍ॅपेतून उमरी पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी निघाले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद तालुक्यातील जवाहरनगर (धुंदी) वरून उमरी (पोहरादेवी) येथे नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या अ‍ॅपे वाहनाला पुसद-दिग्रस रोडवरील बेलगव्हाणजवळ मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेदहा वाजता भीषण अपघात झाला. हे वाहन पुलावरून कोसळल्याने त्यातील सहा जण ठार झाले. दोन गंभीर जखमी चिमुकल्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ज्योती नागा चव्हाण (वय ६०), उषा विष्णू राठोड (५०), सावित्री गणेश राठोड (६०, सर्व रा. धुंदी), वसराम चव्हाण (६०), लीला वसराम चव्हाण (६५, दोन्ही रा. धानोरा), पार्वता रमेश जाधव (५०, रा. वसंतपूर) यांचा समावेश आहे. प्रथमेश अर्जुन राठोड (वय तीन, रा. पांढुर्णा), राज राहुल चव्हाण (वय ५, रा. टोकी तांडा मोहा) हे दोन चिमुकले गंभीर जखमी असून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. वाहनातील अन्य आठ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छिराम राठोड यांच्या घरी ही सर्व नातेवाईक मंडळी जमली होती. मंगळवारी सकाळी हे सर्व सोळा जण धुंदी येथील ज्ञानेश्वर गणेश राठोड याच्या तीन चाकी अ‍ॅपेतून उमरी पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी निघाले. धुंदीचा घाट ओलांडल्यानंतर बेलगव्हाण जवळील छोट्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले व अ‍ॅपे नाल्यात कोसळला. त्यात चार जण जागीच ठार झाले. जखमी बारा जणांना अ‍ॅम्बुलन्सने पुसद येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान लीला चव्हाण व सावित्री राठोड या दोन महिलांचा मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सुरुवातीला आमदार इंद्रनील नाईक यांनी खासगी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारासाठी योग्य निर्देश दिले व आर्थिक मदत केली. तसेच आमदार निलय नाईक यांनी जखमी व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

बोकड सुरक्षित

बंजारा समाजाचे उमरी (पोहरा देवी) श्रद्धास्थान असून नवस फेडण्याची परंपरा आहे. यासाठी बोकडाचा बळी दिला जातो. या अपघातात वाहनातील सहा जणांचे बळी गेले. मात्र, बळी देण्यासाठी सोबत घेतलेला बोकड मात्र या अपघातानंतरही सुरक्षित राहिला.

चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मालवाहू ॲपेच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून कोसळल्याने सहाजणांना जीव गमवावा लागला. त्यात चालक ज्ञानेश्वर राठोड (धुंदी ) जखमी झाला. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला व त्याने बाजूलाच असलेल्या झाडाला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी घटनास्थळावरील लोकांनी त्याला पकडून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT