नागपूर

पहिल्या माळ्यावरून पडून चिमुकला ठार; भुताटकीच्या चर्चेने धरला जोर

योगेश बरवड

नागपूर : शताब्दीनगर भागातील सीसीटीव्हीत भुताची प्रतिमा दिसल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेने परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण कायम असतानाच भूत दिसला त्या घराच्या शेजारच्या दोन वर्षीय चिमुकल्याचा पहिल्या माळ्यावरून पडून करून अंत झाला. यामुळे भुताटकीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कुणीही उघडपणे येऊन बोलायला तयार नाही.

भारव दुपारे असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील विकास खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. दोन मुले आणि पत्नीसह ते शताब्दीनगरातील ज्योती किराणाजवळ भाड्याने राहतात. मृत भारव हा धाकटा मुलगा होता. दोन्ही भाऊ अंगणात आणि वर गॅलरीत खेळायचे. गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे खेळत होते. खेळता खेळताच ते वरच्या माळ्यावर गेले.

वॉलला डिझाइन म्हणून आडवे बार बसविण्यात आले आहे. चिमुकला नकळत पाइपवर चढला आणि तोल जाऊन पडला. त्याच्या आवाजाने एकदम खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी धावपळ करीत त्याला दोन-तीन दवाखान्यांमध्ये नेले. परंतु, प्रत्येक ठिकाणीच मेडिकलला नेण्याचा सल्ला दिला गेला. मेडिकलमध्ये डॉक्टरांना तपासताच मृत घोषित केले.

२७ जुलैलाच भारवचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्याच्या अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारे कुटुंब वास्तव्यास असलेल्या घराच्या केवळ एक घर सोडून असलेल्या जागेतच कथित महिला भुताची छायाकृती कैद झाल्याचा दावा करण्यात आला होता. भुताटकीच्या घटनेने निर्माण झालेली भीती आजही स्थानिकांच्या मनात कायम आहे.

योगायोगाने या भागात राहणाऱ्या ऑटोचालकाचा हिंगणा मार्गावर ऑटो उलटून मृत्यू झाला. स्थानिक व्यक्ती सायकल घेऊन जात असताना पडून मृत्यू ओढवला. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिक प्रचंड घाबरले आहेत. भुताटकी संदर्भातील आणखी दोन चर्चा आज पुढे आल्या.

पहिल्या कथेत जवळच राहणाऱ्या आईच्या स्वप्नात पांढरी साडी धरून महिला तिच्या बाळाला ओढत होती. दुसरा दिवस उजाडताच घाबरलेली आई मुलासह गावी निघून गेली. दुसऱ्या कथानकानुसार दोनच दिवसांपूर्वी एक अनोळखी महिला वस्तीत आली होती. ती काहीशी बडबड करीत होती. तिच्या दाव्यानुसार पांढरी साडी घातलेली महिला स्वप्नात आली.

‘तू माझ्या मुलाला नेले, मी तुझा मुलगा नेईल’, असे स्वप्नातील महिलेने सांगितल्याचे तिचे म्हणणे होते. त्यानंतर दोनच दिवसांनी चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडल्याने सर्वत्र कमालीची भीती आहे. कुणीही या विषयावर बोलायला तयार नाही. विज्ञान युगात भुताटकीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतु, एकामागून घडणाऱ्या घटना क्लेशदायक असल्याचे नागरिक सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT