file photo 
नागपूर

...म्हणून ऋषी कपूर यांना बहिणीच्या लग्नात सहभागी होता आले नाही 

राघवेंद्र टोकेकर

नागपूर : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. नागपुरातील कुटुंबाशी सलगी साधलेल्या कपूर कुटुंबाचे कायमच नागपुरात येणे-जाणे असायचे. 1986 साली झालेल्या एका लग्न समारंभात संपूर्ण कपूर कुटुंबाने उपस्थिती लावली. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या ऋषी कपूर यांना समारंभाला येता आले नव्हते. तशीच इच्छा राज कपूर यांनी व्यक्‍त केली होती. ऋषी यांची बहीण अनू खेता यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

राज कपूर यांची बहीण ऊर्मिला यांचा नागपुरातील खाणमालक चिरंजित सियाल यांच्याशी विवाह झाला अन्‌ कपूर परिवाराचे नागपूरशी ऋणानुबंध जुळले. त्यानंतर कायमच कपूर कुटुंबीयांचे नागपुरात येणे-जाणे असायचे. सियाल यांच्या घरी कायमच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर यायचे. सियाल कुटुंबाचे कपूर घराण्याशी नाते सर्वश्रुत होते. त्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले ऋषी कपूर यांची एक झलक पाहण्यासाठी सियाल यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी व्हायची. याचसाठी ऋषी कपूर नागपुरात येणे टाळायचे, असे अनू खेता यांनी सांगितली. 

ऊर्मिला सियाल यांच्या तिसऱ्या मुलीचा 1986 साली नागपुरात विवाह झाला. या समारंभात संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते. मात्र, चाहत्यांची प्रचंड गर्दी प्रीती यांच्या विवाहात बाधा ठरू शकते, हा अंदाज व्यक्‍त करून ऋषी कपूर यांनी उपस्थित राहू नये, अशी इच्छा राज कपूर यांनी व्यक्‍त केली होती. या लग्नातील संपूर्ण कपूर कुटुंबाचे छात्राचित्र एका ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असले, तरी त्यात ऋषी कपूर उपस्थित नाहीत. 

नोव्हेंबरमध्येच अखेरचे दर्शन 
ऋषी कपूर यांची आतेबहीण व ऊर्मिला सियाल यांची मुलगी अनू खेता यांनी त्यांचे अखेरचे दर्शन नोव्हेंबरमध्येच घेतले होते. अनू खेता यांनी ही आठवण सांगितली. 

खड्ड्यांमुळे त्रस्त 
2017 साली होशंगाबादला गेलेले ऋषी कपूर नागपूरमार्गे परतणार होते. परतीच्या प्रवासात भोपाळ-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांचा त्यांना त्रास झाला. त्रस्त झालेल्या ऋषी कपूर यांनी प्रवासातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. 

  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT