distance 
नागपूर

जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दीचगर्दी सोशल डिस्टंसिंग व संचारबंदीचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सरकारने केलेले नियम सरकारी कार्यालयातच पाळले जात नसल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसते आहे. त्यामुळे या ठिकाणी भिती आणि काहीसे रोषाचे वातावरण आहे. विविध कारणांच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. इतरांना सल्ला देणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातच सोशल डिस्टंसिंग आणि संचारबंदीची पायमल्ली होत आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच सोबत सोशल डिस्टंसिंग ठेवण्याचाही संदेश देण्यात येत आहे. संचारबंदी असल्याने नागरिकांना इतरत्र जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. इतर जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या परवानगीची आवश्‍यकता आहे. या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे.    

सविस्तर वाचा - ...तर सप्टेंबरमध्ये होऊ शकते नव्या सत्राची सुरुवात                                                                                                भीतीचे वातावरण                                                                                     कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  गर्दीमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. येथे सोशल डिस्टसिंग संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याची चर्चा होत आहे. शासनाने  कर्मचाऱ्यांची उपस्थिती दहा टक्के केली असताना जिल्हाधिकारी कार्यालयात 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि रोष आहे. याबाबतची तक्रार नागपूर जिल्हा महसूल तृतीय कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT