वारंवार डोळे चोळणे धोक्याचे
वारंवार डोळे चोळणे धोक्याचे  sakal
नागपूर

Nagpur : वारंवार डोळे चोळणे धोक्याचे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शरीरातील नाजूक आणि अनमोल असलेला अवयव म्हणजे डोळा. अलीकडे मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर होत असल्याने डोळ्यांनाच नजर लागली आहे. डोळे कोरडे होण्याचे प्रकार वाढले. डोळ्यांना खाज सुटणे तसेच इतर कोणत्याही समस्येमुळे डोळे चोळावे लागतात. कळत-नकळत डोळे चोळण्याची सवय जडते. डोळे चोळल्यास संसर्ग होतो.

यातून डोळ्यांशी संबंधित समस्या वाढत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञानी नोंदविले आहे. वेगाने डोळे चोळल्याने डोळ्यांना हानी पोहोचते. डोळ्यांना वारंवार खाजवल्याने बुबुळावर दाब पडतो. कार्नियाचा आकार बदलण्याची शक्यता असते.

कधी कधी डोळ्यातून पाणीही येऊ लागते. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला कार्निअल वक्रता येण्याची भीती असून नजर कमजोर होण्याची शक्यता आहे. यामुळे डोळे चोळू नका, असे डॉ. निलेश गादेवार म्हणाले.

डोवारंवार डोळे चोळणे धोक्याचे

कॉर्नियाचे नुकसान - डोळ्यांना सतत चोळल्याने कॉर्नियावर ओरखडे येण्याची शक्यता. दृष्टी धुसर होण्याची भीती. पुढे अंधत्वाचा धोका.

संसर्ग - डोळे चोळल्याने डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह वाढतो. डोळ्यांना अधिक जास्त खाज सुटते.

केराटोकोनस - डोळ्यांचा कॉर्निया पातळ होऊ लागल्यावर केराटोकोनसची समस्या उद्भवते.

ऍलर्जी - डोळ्यांना जास्त चोळल्याने देखील ऍलर्जी होऊ शकते. ब्लेफेराइटिसमुळे पापण्यांना सूज येते कारण तेल ग्रंथी बंद असतात.

डार्क सर्कल - डोळे सतत चोळल्याने ज्या लोकांच्या त्वचेचा रंग गडद असतो त्यांना डार्क सर्कलची समस्या निर्माण होते.

डोळे लाल होतात - डोळ्यांना जास्त चोळल्याने केशिका फुटू शकतात आणि जखमा होऊ शकतात. यामुळे डोळे नेहमीच लाल दिसतात.

डोळ्यांची निगा राखण्यासाठी

संगणकावर काम करताना दर २० मिनिटांनी संगणकापासून २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पहा.

कोरडेपणा टाळण्यासाठी २० वेळा डोळ्यांची उघडझाप करावी

दर २० मिनिटांनी संगणकांवरून उठून २० पावले चाला

अँटिबायोटिक्स ड्रॉप, लुब्रिकेटिंग ड्रॉप टाकून साधारणत: सात दिवसांत ही लक्षणे नाहीशी होऊ शकतात. डोळ्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळले पाहिजे. तसेच ट्वेंटी-ट्वेंटीचा फार्मुला अंमलात आणल्यास केवळ तुमच्या दृष्टीसाठी चांगले नाही तर संपूर्ण शरीरासाठी योग्य आहे.

-डॉ. निलेश गादेवार, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT