nagpur funeral
nagpur funeral 
नागपूर

मुलाला व्हिडिओ कॉलवरून घ्यावे लागले वडिलांचे अंत्यदर्शन, लेकीने पार पाडली ही जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने नेदरलॅंडमध्ये अडकलेल्या मुलाला वडिलांच्या अंत्यसंस्कारापासूनही वंचित राहावे लागल्याची ह्दयद्रावक घटना पुढे आली आहे. या प्रसंगामुळे मुलीने जड अंतकरणाने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे मुलाला व्हिडिओ कॉलिंगद्वारे पित्याचे अंत्यदर्शन घ्यावे लागले अन्‌ त्याच्या अश्रूचा बांध फुटला. 

दिघोरी, साईनगरातील 59 वर्षीय रामकृष्ण लटारूजी मोहितकर यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या तीन मुली असून एक मुलगा आहे. मुलगा कपिल हा नेदरलॅंडमध्ये एका शहरात सॉफ्टवेअर इंजिनिअर असून एक मुलगी हर्षा न्यूझीलंडमधील एका शहरात राहते. दुसरी मुलगी संजीवनी मध्यप्रदेशातील पारडसिंगा येथे राहते. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असून विदेशातून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध लावला आहे. त्यामुळे नेदरलॅंडमधील कपिल व हर्षाला अंत्यसंस्काराला येणे कठीण झाले.

शहरापासून 60 किमी अंतरावर मध्यप्रदेशातील पारडसिंगा येथील मुलगी लॉकडाऊनमुळे पित्याच्या अंत्यसंस्काराला येऊ शकली नाही. त्यामुळे नागपुरात राहणारी सर्वात मोठी मुलगी शुभांगी नितीन झाडे हिने जड अंतकरणाने पित्याला दिघोरी घाटावर मुखाग्नी दिली. हिंदू संस्कृतीत आई किंवा वडिलांच्या चितेला मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे. परंतु अलिकडे मुलींनीही ही जबाबदारी पार पाडल्याचे अनेक उदाहरण आहेत. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कपिलला अखेर व्हिडिओ कॉलिंगद्वारे पित्याचे अंत्यदर्शन घ्यावे लागले.

पित्याच्या शेवटच्या क्षणातही त्यांच्याजवळ नसल्याचे दुःख त्याच्या व हर्षाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले. मृतक रामकृष्ण मोहितकर यांच्या पत्नी माया मोहितकर या नवेगाव पंचायत समितीच्या शाळेत शिक्षिका आहेत. पतीच्या निधनानंतरही मुलगा तसेच दोन मुली लॉकडाऊनमुळे उपस्थित होऊ शकला नाही, त्यामुळे त्या चांगल्याच हादरल्या. परिसरातील नागरिक व काही आप्तांनी त्यांचे सांत्वन केले व मुखाग्नी देणाऱ्या शुभांगीला धीर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT