file photo 
नागपूर

४५ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांचे नुकासान

नीलेश डोये

नागपूर : गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा चांगले पीक होण्याचा अंदाज होता. परंतु संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरण पिकासाठी मारक ठरत आहे. विशेष म्हणजे सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. जास्त पावसामुळे सोयाबीनचे पाने पिवळी पडत असून खोडमाशी, चक्रीभुंगा किडीसोबत मुळतड रोगाचा प्रादुर्भाव झाला असून जिल्ह्यात ४० ते ४५ हजार हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. परंतु अद्याप सर्वेक्षणाच्या सूचना करण्यात नाही. दरम्यान आज कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सोयाबीनच्या शेतांची पाहणी केली.  

   
कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरिपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर इतके होते. परंतु शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे होता. त्यामुळे यंदा याच्या क्षेत्रात वाढ झाली.  १ लाख २२२२ हेक्टरवर  सोयाबीनची पेरणी झाली. सोयाबीनचे पीक यंदा चांगले होण्याचा अंदाज शेतकऱ्यांना होता. सोयाबीनची पाने पिवळी पडत आहे.

नुकतेच कृषी विद्यापीठातील कीटशास्त्र डॉ.हरिष  सवई व कृषी वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. मोहन पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील अनेक शेतीची पाहणी केली. पिकांवर खोडमाशी आणि चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने झाडाच्या मुळाद्वारे अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली असून पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे पाने , फुले गळायला लागलीत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अहवालात नमुद केले आहे. परंतु अद्याप सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले नाही. कृषी मंत्री भुसे  यांनी वर्धा मार्गावरीब मोहगाव येथील सोयाबीन शेतीची पाहणी केली. परंतु सर्वेक्षणाचे आदेस दिले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.  

सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी : देशमुख

सोयाबीन वर आलेल्या रोगामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता व जिल्हा परिषद सदस्य असलेले देशमुख यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन देऊन केली.  प्रसंगी जिल्हापरिषद चे माजी उपाध्यक्ष  बंडोपंत उमरकर,  डॉ. अनिल ठाकरे,  बापुभाऊ चरडे,  ओम खत्री,  जयंत टालाटुले, नरेश तवले  आदि मान्यवर वह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT