Soybean losses at economic level 
नागपूर

शेतकऱ्यांच्या नशिबी सुखच नाही; चांगले पीक होण्याचा अंदाज असताना झाले हे...

नीलेश डोये

नागपूर  : शेतकऱ्यांवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा चांगले पीक होण्याचा अंदाज होता. परंतु संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरण पिकासाठी मारक ठरत आहे. विशेष म्हणजे सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. जास्त पावसामुळे सोयाबीनचे पाने पिवळी पडत असून खोडमाशी, चक्रीभुंगा किडीसोबत मुळतड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयबीनचे हे नुकसान आर्थिक पातळीवर असल्याचा निष्कर्श कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात दिला आहे.
   
कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरिपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर इतके होते. परंतु शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे होता. त्यामुळे यंदा याच्या क्षेत्रात वाढ झाली.  १ लाख २२२२ हेक्टरवर आता पर्यंत सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक यंदा चांगले होण्याचा अंदाज शेतकऱ्यांना होता. परंतु यावर पाणी फेरणार असल्याचे दिसते. सोयाबीनची पाने पिवळी पडत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात असे चित्र आहे.

कृषी विद्यापीठातीलकीटशास्त्र डॉ.हरिष  सवई व कृषी वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. मोहन पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील अनेक शेतीची पाहणी केली. पिकांवर खोडमाशी आणि चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने झाडाच्या मुळाद्वारे अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली असून पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे पाने , फुले गळायला लागलीत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अहवालात नमुद केले आहे. 

याचा उपयोग करा
चक्रीभुंगा व खोडमाशीच्या नियंत्रणासाठी एन्डोक्सीकार्ब १५.८ इ.सी. ६.६ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. किंवा क्लोरॅट्रानीलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी पावसामुळे जमिनीत ओलावा, झाडाची पाने, फुले, शेंगा गळत असल्यास, पानावर बुरशीचे ठिपके असल्यास १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईडची फवारणी करावी.

नुकसान भरपाई द्या
सोयाबीन आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.
- अनिल निधान,
विरोधी पक्ष नेते, जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT