Special tourist Vithai bus service of ST closed nagpur sakal
नागपूर

Nagpur News : एसटीची विशेष पर्यटन ‘विठाई’ बससेवा बंद

जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना मुकले पर्यटक ः आणखी एक उपक्रम थंडबस्त्यात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनानंतर पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यासह परराज्यातून नागपूरला येणाऱ्यांना शहरासह जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे बघायची असतात. यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ आगारातून ‘विशेष पर्यटन बससेवा’ सुरू केली होती. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने पर्यटन प्रेमींचा हिरमोड झाला आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने २२ मे २०२२ मध्ये ‘विठाई’ ही बस विशेष पर्यटन बससेवा सुरू केली होती. मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावरून याची सुरुवात झाली होती. दर रविवारी आणि शासकीय सुटीच्या दिवशी ही बस सेवा होती. ही बस सकाळी ८ वाजता स्थानकावरून सुटून सर्व स्थळांना भेटी देत रात्री ८ वाजता बस परत येत होती. प्रतिव्यक्ती २९५ रुपये भाडे ठरले होते.

तर ज्येष्ठ नागरिक व ५ ते १२ वर्षाखालील मुलांना ५० टक्के सवलत दिली होती. लांब अंतरावरील जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे कमी खर्चात बघायला मिळत असल्याने प्रवाशांचा या बससेवेला चांगला प्रतिसाद होता. शिवाय महामंडळाने प्रवाशांपर्यंत ही योजना पोहोचविली होती. त्यामुळे प्रवासी आधीच बुकिंग करायचे.

तर बससेवेबद्दल माहिती विचारण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात फोन खणखणत होते. मात्र, नंतर ही योजना थंडबस्त्यात गेली. गणेशपेठ आगारात असलेल्या या बससेवेचा फलक पाहून चौकशी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र, प्रवाशांना हा उपक्रम बंद असल्याचे कळल्यावर त्यांची निराशा होत आहे. ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

या प्रेक्षणीय स्थळांना होती विशेष बससेवा

- शिवमंदिर, सुराबर्डी

- विदर्भाचे पंढरपूर, श्री क्षेत्र धापेवाडा

- गणेश मंदिर, श्री क्षेत्र आदासा

- लेक व गार्डन, खिंडसी

- श्रीराम गडमंदिर, रामटेक

- ड्रॅगन पॅलेस, कामठी

सध्या पर्यटन बससेवा बंद आहे. मात्र, सुरू करण्याबाबत लवकरच विचार करण्यात येईल.

- गौरीशंकर भगत, आगार व्यवस्थापक- गणेशपेठ

बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची हौस असते. एकाच दिवशी सर्व स्थळे पाहण्यासाठी एसटीची ही सेवा चांगली होती. मात्र, गणेशपेठ आगारात आल्यावर ही सेवा बंद असल्याचे कळले.

- रमेश ठवरे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Saptashrungi Temple : वणी साप्तश्रृंगी गडावर श्री भगवती मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले; भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था!

Latest Marathi News Live Update : - मुंबईत समाजवादी पार्टीचे एकाला चलो, उत्तरभारतीय मतदारांवर सर्वाधिक मदार

Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

BMC Election: महायुतीत नाराजी स्फोट! शिंदे गटात राजीनाम्यांची मालिका, भाजपमध्येही समाज माध्यमावर खदखद

SCROLL FOR NEXT