SRPF 
नागपूर

आता घाला म्हणा हुज्जत, नागपूरच्या या भागात एसआरपीएफ तैनात 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचे वाढते संकट आणि नागरिकांचे असहकार्य तसेच नागरिकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले किंवा हुज्जतबाजी लक्षात घेता "रामबाण' उपाय म्हणून आता अर्ध्या शहरात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहेत. तसेच इंडियन रिझर्व्ह बटालियनचे पथक (आयआरबीपी) देखील तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित परिसरासह अन्य भागात जर कुणी पोलिसांशी हुज्जत घातल्यास काही खैर नाही, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दीन महिन्यांपूर्वी शहरात कोरोना बाधित आढळले होते. तसेच मरकजहून आलेले काही नागरिक नागपुरात दडून बसले होते. शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन असतानाही शहर पोलिस कर्मचाऱ्यांना नागपूरकर सहकार्य करीत नव्हते. विनाकारण रस्त्यावर फिरणे किंवा कोणतेही कारण सांगून पोलिसांशी हुज्जत घालणे किंवा थेट हल्ला करण्यापर्यंत नागरिकांनी मजल मारली होती. ही बाब लक्षात घेत आणि शहरातील कोरोनाचा फैलाव पाहता आता पोलिस आयुक्‍त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात एसआरपीएफची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारपासून शहरातील कोरोनाबाधित परिसरात एसआरपीएफ तैनात करण्यात आली आहे. 

कोरोनाबाधित परिसरात मोठा ताफा
मोमीनपुरा येथे काही रुग्ण पॉझीटिव्ह आढळून आल्याने हा परिसर सील करून तेथे राज्य राखीव पोलिस बल तैनात करण्यात आले. राज्य राखीव पोलिस बलाच्या जवानांना मोमीनपुऱ्याच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहर पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस बलाचा आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनची मदत घेण्यात आली. 

दोन्ही पथकातील जवान बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यात राज्य राखीव पोलिस बल गट 15 जवान परिमंडळ 3 येथे तैनात करण्यात आले. याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यानुसार तहसील हद्दीत 6 सेक्‍शन, लकडगंज, शांतीनगर आणि गणेशपेठ हद्दीप प्रत्येकी 2 सेक्‍शन तैनात करण्यात आले. या ताफ्यात 4 अधिकारी आणि 90 जवानांचा समावेश आहे. 

राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 13 चा ताफा परिमंडळ 4, 2 आणि 5 येथे तैनात करण्यात आला. परिमंडळ 4 मध्ये 1 सेक्‍शन (9 जवान), परिमंडळ 2 येथे 1 प्लॉटून (1 अधिकारी आणि 27 जवान) आणि परिमंडळ 5 येथे 1 प्लॉटून (1 अधिकारी आणि 27 जवान) असा ताफा तैनात करण्यात आला. याशिवाय 2 सेक्‍शन (1 अधिकारी आणि 18 कर्मचारी) शहर नियंत्रण कक्ष येथे राखीव म्हणून ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT