Pradeep Tarar, Lavanya Tarar and Sarika Tarar sakal
नागपूर

SSC Exam Result : आईचा मृत्यूशी लढा, लेकीचा दहावीत डंका

आई अतिदक्षता विभागात (आयसीयू) जीवन-मृत्यूशी झुंज देत असताना तिच्या लाडक्या लेकीने दहावीच्या परीक्षेत डंका वाजवत तब्बल ९४.२० टक्के गुणांची घसघशीत कमाई केली.

नरेंद्र चोरे

नागपूर - आई गेल्या तीन-चार दिवसांपासून एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) जीवन-मृत्यूशी झुंज देत असताना तिच्या लाडक्या लेकीने दहावीच्या परीक्षेत डंका वाजवत तब्बल ९४.२० टक्के गुणांची घसघशीत कमाई केली. भविष्यात बारावी सायन्सनंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून नामवंत इंजिनिअर बनण्याचे स्वप्न तिने बोलून दाखविले.

साईनाथनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या व अजनी चौकातील माऊंट कार्मेल हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या लावण्या प्रदीप तरार हिने शैक्षणिक करिअरची पहिली पायरी गणल्या जाणाऱ्या दहावीत ५०० पैकी ४७१ गुण मिळविले. थोरली मुलगी शिकून मोठी व स्वतःच्या पायावर उभी व्हावी, यासाठी तिच्या आई-वडिलांनीही तिला खूप प्रोत्साहन दिले.

दहावीचे वर्ष असल्याने दोघांनीही तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले. यासाठी ते यंदा बाहेर फिरायलासुद्धा गेले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, लेकीनेही घवघवीत यश मिळवून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. शाळेत नियमित क्लासेस करणाऱ्या लावण्याने दहावीत घराजवळ एका खासगी ट्युशनमध्ये शिकवणी लावली होती. मात्र ‘सेल्फ स्टडी’वरच तिने अधिक भर दिला. दहावीत नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळतील, अशी तिला आशा होती. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याने ती आनंदी आहे.

दहावीची परीक्षा संपल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ती बारावीच्या तयारीला लागली. सध्या सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत खासगी शिकवणीवर्गाला जाते. त्यानंतर बारा ते रात्री आठपर्यंत लायब्ररीत अभ्यास करते. घरी परतल्यानंतर जेवण केल्यावर पुन्हा होमवर्कमध्ये व्यस्त असते.

मम्मी-पप्पाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुढील दोन वर्षे कसून मेहनत घ्यावीच लागेल, असे ती म्हणाली. दुर्दैवाने माझ्या यशाचा आनंद आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या आईसोबत शेअर करू शकत नसल्याचे दुःख तिने बोलून दाखविले. वडील प्रदीप तरार हे खासगी नोकरी करतात, तर आई सारिका गृहिणी आहे. तरार परिवारातील लेकीच्या या यशाबल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT