ST Bus Sakal
नागपूर

ST Bus : एसटीच्या छत गळतीला ‘ताडपत्री’चा आधार

तुम्ही भर पावसात एसटीने प्रवास करीत असाल तर आधी बसच्या छतावर लक्ष द्या.

सकाळ वृत्तसेवा

- अखिलेश गणवीर

नागपूर - तुम्ही भर पावसात एसटीने प्रवास करीत असाल तर आधी बसच्या छतावर लक्ष द्या. ज्या ठिकाणी ताडपत्री सारखे ‘पॅचेस’ लावलेले दिसतील, तेथील आसनावर सांभाळूनच बसा. अन्यथा बसमध्ये डोक्यावर छत्री घेण्याची वेळ येऊ शकते. अशीच स्थिती सध्या बहुतांश गाड्यांची झाली आहे. छताच्या गळतीवर तात्पुरता उपाय म्हणून ताडपत्री सारखे पॅचेस लावलेले दिसत आहेत.

वेळ संध्याकाळी ५ वाजताची. नागपूर-तिरोडा मार्गावर धावणारी बस गणेशपेठ मध्यवर्ती स्थानकावर उभी होती. पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी बसच्या छताला ताडपत्री सारखे ‘पॅचेस’ लावले होते. स्टीकर सारखी ही पट्टी छताला चिकटविण्यात येते. त्यामुळे गळतीची तात्पुरती सोय होते.

मात्र, पुन्हा काही दिवसांनी हे ‘पॅचेस’ निघतात. त्यातून पुन्हा पाणी गळते. गळतीवर हा कायमचा उपाय नाही. एसटी महामंडळाच्या बहुतांश बसेसची स्थिती अशीच झाली आहे. अशा ‘पॅचेस’ लावलेल्या बहुतांश गाड्या दिसतात. त्यामुळे प्रवाशांना छत गळतीचा सामना करावा लागत आहे.

हवेत उडणाऱ्या छतातून तरी धडा घ्यावा

काही दिवसांपूर्वी गडचिरोली-अहेरी या बसचे छत चक्क हवेत उडाल्याची चित्रफित समाजमाध्यमात व्हायरल झाली होती. महामंडळाने याची दखल म्हणून अभियंत्यावर नाहक कारवाई केली. तसेच अहेरी आगाराच्या बसमध्ये सुद्धा भर पावसात चालक एका हातात स्टेअरिंग तर दुसऱ्या हाताने वायपर फिरवत असल्याचे व्हायरल व्हीडिओमधून पुढे आले होते.

त्यामुळे खिळखिळ्या बसची पावसाळ्यात वाट कठीण असल्याचे पुढे येत आहे. जुन्या गाड्यांमुळे देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च महामंडळाला होत आहे. मात्र, तरीही बहुतांश गाड्यांमध्ये देखभाल-दुरुस्तीचा अभाव आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे.

बहुतांश बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. खराब रस्त्यावरून गाडी धावताना बॉडी हलते. त्यामुळे छत गळतीवर लावण्यात आलेले पॅचेस निघून जातात. पॅचेस ही केवळ मलमपट्टी आहे. पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर आहे. दहा वर्षापेक्षा जास्त आयुमर्यादा ओलांडलेल्या गाड्यांना बाद केले पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस- महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT