st bus sakal
नागपूर

‘गांव तेथे एसटी’ची ओळख पुसली

अनेक गावांत बसच येत नाही, नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची चाके नागपूर जिल्ह्यात थांबलेली आहे. संपाच्या तीन महिन्यांच्या काळात गावांत एकाही एसटी न धावल्याने ‘गांव तिथे एसटी’ची ओळख पुसली आहे. संपापूर्वी ३४० मार्गावरून संपूर्ण जिल्ह्यात एसटी धावत होती. आज फक्त प्रमुख २२ मार्गांवर एसटी धावत असून त्याची टक्केवारी सात टक्के आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

‘जनसामान्यांसाठी रस्ता तिथे एसटी’ अशी उपलब्धी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ची रस्ता तिथे एसटी सध्या पोहोचत नसल्याची स्थिती आहे. नागपूर जिल्ह्याची सध्या ही परिस्थिती असल्याने गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतेक गावातील नागरिकांना एसटीच्या बस शिवाय दुसरा पर्याय नाही. परिवहनाचे दुसरे कुठले ही साधन नसल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच गांवकरी एसटीची मोठी आतुरतेने वाट पाहतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातल्या गावापर्यंत एसटी पोहोचलेली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ २२ प्रमुख मार्गावरून एसटी बस धावत आहे. संपापूर्वी ही स्थिती वेगळी होती. जिल्ह्यातील ३४० मार्गावरून पूर्वी एसटी धावत होती. त्यावेळी गावांपर्तंय एसटी पोहोचत होती. आज मात्र, स्थिती पूर्णपणे बदललेली आहे.

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी जवळपास तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अशा स्थितीत खासगी व काही मोजक्याच चालकांच्या बळावर एसटी रस्त्यावर धावत आहे. नागपूर विभागात ७२ ते ७५ दरम्यान बस मार्गस्थ आहेत. या बसेस तालुका व जिल्हास्तरावर धावत असल्याने केवळ शहरी भागातील प्रवाशांनाच याचा फायदा होत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून एसटी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ‘गांव तेथे एसटी’ची ओळख नागपूर जिल्ह्यातून नामशेष झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT