IRCTC sakal
नागपूर

ST Ticket Booking : प्रवाशांना गर्दीपासून दिलासा! एसटीचे तिकीट बुकिंग होणार ‘आयआरसीटी’वर

रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची सर्वात जास्त पसंती आरआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन)च्या वेबसाइटला असते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची सर्वात जास्त पसंती आरआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन)च्या वेबसाइटला असते. आता याच वेबसाइटवरून एसटीच्या प्रवाशांनाही तिकीट बुक करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.

आयआरसीटीसी आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. मुख्यतः आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. देशातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी आयआरसीटीसीच्या ऑनलाइन तिकीट पोर्टलवरून रेल्वे प्रवासाची तिकिटे बुक करतात. आता ही सुविधा एसटीच्या प्रवाशांना सुद्धा मिळणार आहे.

महामंडळाने प्रवाशांना या माध्यमातून ऑनलाइन तिकीट बुक करण्याचे एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता एसटीच्या प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी गर्दीत रांगेमध्ये उभे राहण्याची गरज उरणार नाही.

तिकीट बुकिंगची ऑनलाइन सुविधा रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सला उपलब्ध आहे. मात्र, एसटीच्या प्रवाशांकरिता नव्हती. सध्या ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यावर प्रवाशांचा भर असल्याने एसटीच्या प्रवाशांना एक चांगली सुविधा होईल, असा विश्वास महामंडळाला आहे.

आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळामध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंगचा सामंजस्य करार झाला आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल. या माध्यमातून एसटीच्या प्रवाशांना एक चांगली सुविधा मिळेल.

- श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती विभाग (एसटी महामंडळ)

असे होणार एसटीचे तिकीट बुक

एसटीचे तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर प्रोफाइल तयार करावा लागेल. वेबसाईटवरील ‘बसेस’ या पर्यायावर जावे लागेल. तेथे https://www.bus.irctc.co.in ही नवीन लिंक ओपन होईल. सध्या यावर खासगी ट्रॅव्हल्सचे बुकिंग करता येते. आता एसटीचा सुद्धा पर्याय या ठिकाणी देण्यात येणार आहे. यातून राज्यातील कोणत्याही ठिकाणाकरिता एसटीचे तिकीट बुक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT