st bus st bus
नागपूर

सरकारकडून बळाचा वापर; एसटी कर्मचाऱ्यांना दिले पेंडॉल काढण्याचे आदेश

सोमवारी एसटी कर्माचाऱ्यांना पेंडॉल काढण्याचे आदेश गणेशपेठ पोलिसांकडून देण्यात आले

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास महिनाभरापासून आंदोलन (st workers strike) सुरू आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. असे असले तरी गणेशपेठ पोलिसांनी कर्मचाऱ्यांना पेंडॉल काढण्याचे आदेश दिले आहे.

गणेशपेठ बसस्थानकावर (ganeshpeth stand) एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी बसेस धावायला सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी संपकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. यामुळे राज्यातील जवळपास २५० आगार बंद आहेत. संपकरी मागण्यांवर ठाम असल्यामुळे संप मिटवणे सरकारसाठी आव्हानच झाले आहे.

सोमवारी एसटी कर्माचाऱ्यांना पेंडॉल काढण्याचे आदेश गणेशपेठ पोलिसांकडून देण्यात आले. एसटी कर्मचारी गणेशपेठ बसस्थानकावर पेंडॉल टाकून आंदोलन करीत आहे. तासाभरात कर्मचाऱ्यांनी पेंडॉल न काढल्यास पोलिस स्वतः पेंडॉल काढणार, असे आंदोलकांना सांगितले. कुणाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे, असे विचारले असता परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या आदेशावरून पेंडॉल काढणार असल्याचे गणेशपेठ पोलिसांनी सांगितले.

संपकरी आक्रमक होण्याची शक्यता

संपकरी आंदोलनावर ठाम आहे. अनेक मागण्या राज्य सरकार मान्य करण्यास तयार असले तरी आंदोलक मात्र मानायला तयार नाही. संपकरी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्यामुळे सरकारकडून बळाचा वापर होण्याची शक्यता दिसू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून हे आदेश दिले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने (state government) पोलिसांचा वापर करून पेंडॉल काढल्यास संपकरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Earth : पृथ्वीच्या खाली आहे अदृश्य ढाल; जी सगळ्या संकटांपासून आपल्याला ठेवते दूर, नव्या संशोधनातून रहस्यमय खुलासा, पाहा सविस्तर

Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT