sweet shops 1.jpg sakal
नागपूर

नागपूर : खाद्यपदार्थ, केकच्‍या तपासणीला सुरुवात

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएची मोहीम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अन्न व औषधी प्रशासनातर्फे(FDA) दरवर्षी नाताळ(christmas) आणि नववर्षाच्या(new year) निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेस सुरवात झाली आहे. नागपूर शहरातील(nagpur city) बेकरी आणि मिठाई दुकानांतील अन्न पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. नमुने गोळा करण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु केलेले आहेत.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावरही नजर ठेवण्यात येत आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर मद्याला मागणी असते. त्यामुळे बनावट मद्याची विक्री होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन बारमधील मद्याची तपासणी करून नमुने घेण्यात येत आहे. नाताळच्या निमित्ताने बाजारपेठांमधील बेकरी, चॉकलेट, केक आणि मिठाईची दुकाने सजली आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी उपाहारगृह सज्ज होऊ लागले आहेत. केक, चॉकलेट, मिठाईला अधिक मागणी असते. याअनुषंगाने यात भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरवर्षी या काळात एफडीए विशेष मोहीम राबवून भेसळखोरीविरोधात कारवाई करीत असते. शहरातील विशेष मोहिमेला सुरवात झालेली आहे. मिठाईच्या दुकानांतून मिठाईचे नमुने घेतले जात आहेत. तसेच फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, खवा या पदार्थांचेही नमुने घेतले जात आहेत. त्यानंतर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. या तपासणीचे अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नाताळ आणि नवीनवर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांवरील खाद्य पदार्थांची तपासणी केली जात आहे. मोहीम सर्वच जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

अभय देशपांडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT