state 88 Thousand Selection of RTE students esakal
नागपूर

राज्यातील ८८ हजार विद्यार्थ्यांची निवड; आरटीई पोर्टलचा खोळंबा

पालकांना एसएमएस मिळालेच नाही

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी (जि. वर्धा) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे राज्यातील ८८ हजार १३४ विद्यार्थ्यांची तर विदर्भातील १९ हजार ३३१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दरम्यान, आरटीई पोर्टलला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पालकांना प्रवेशाबाबतचे एसएमएस गेलेच नाहीत. यामुळे पालकांचा पहिल्या दिवशी हिरमोड झाला.

रात्री आठ वाजताच्या सुमारास पोर्टल मंदगतीनेच सुरू झाले. सोमवारी (ता. ५) चार वाजल्यानंतर पालकांना लॉटरीद्वारे प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेची माहिती एसएमएसद्वारे मिळणार असल्याची घोषणा प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली होती. असे असले तरी तांत्रिक अडचणींमुळे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

आरटीई प्रवेशाच्या राज्यात ९ हजार ८६ शाळांत १ लाख १ हजार ९०९ जागांकरिता २ लाख ८२ हजार ७८३ पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यातून ८८ हजार १३४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

तर विदर्भातील २ हजार २२० शाळांत २० हजार ११ जागांकरिता ७१ हजार १७६ पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यातून १९ हजार ३३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ एप्रिलपर्यंत संबंधित शाळांत प्रवेश घेता येणार आहे.

विदर्भातील आरटीई प्रवेशाची स्थिती

  • जिल्हा - उपलब्ध शाळा - जागा - अर्ज - निवडलेले विद्यार्थी

    • अमरावती - २४० - २२५५ - ८०११ - २२१३

    • अकोला - १९६ - १९९५ - ६००३ - १९२०

    • बुलढाणा - २२५ - २२६९ - ४७८६ - २१४२

    • यवतमाळ - १९४ - १९७० - ५१४५ - १८७२

    • वाशीम - ९९ - ७२२ - १७६१ - ६६१

    • भंडारा - ९१ - ७६७ - २६०८ - ७६३

    • चंद्रपूर - १९१ - १५०६ - ३८९५ - १४१३

    • गडचिरोली - ६६ - ४१३ - ७६३ - ३३१

    • गोंदिया - १४१ - ८१३ - २८७९ - ८०२

    • नागपुर - ६६३ - ६१८६ - ३१४११ - ६१०६

    • वर्धा - ११४ - १११५ - ३९१४ - ११०८

    • एकूण - २२२० - २००११ - ७११७६ - १९३३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT