Lottery 
नागपूर

ऑनलाइन लॉटरी जीवावर बेतली

पोलिस प्रशासन सुस्त, लॉटरीवाले मस्त

सकाळ वृत्तसेवा

मोहपा - आधीच जनता कोरोनामुळे त्रस्त असून रोजगार गेलेले आहेत. त्यातच गावात बेरोजगार तरुणांना ऑनलाइन लॉटरी झटपट पैसा मिळवण्यासाठी आकर्षित करत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव पण गमवावा लागत असल्यामुळे गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी जिल्हाधिकारी नागपूर यांना गावातील ऑनलाइन लॉटरी बंद करण्यासाबंधीचे निवेदन दिलेले आहे.

गावात सुशिक्षित तरुणांची व कोरोनामुळे रोजगार गमावणाऱ्या तरुणांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. कोरोनामुळे सगळ्यांच्याच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेल्या आहे. तसेच या पावसाळ्यात शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा अशीच काहीसी आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हे आव्हान गावातील अनेक बेरोजगाराच्या समोर उभे ठाकले आहे. गावात लॉटरी सेंटरमुळे तरुण मंडळी व बच्चेकंपनीसुद्धा या व्यसनास बळी पडत आहे. ही गावाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. परंतु या चिंतनीय समस्येकडे सर्व नेत्यांचे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच आठवड्यात दोन तीन दिवसाआधी गावातील पस्तीशीतील तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. यापूर्वी सुद्धा गावातील अन्य दोन तरुणांनी लॉटरीमध्ये पैसे गमावल्यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा गावामध्ये आहे. गावात ज्या ठिकाणी हे दोन्ही लॉटरी सेंटर आहे, ते गावातील मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी आजूबाजूला अनेक लोक वस्तीला असतात. येथूनच शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण- तरुणी ये-जा करीत असतात.

या लॉटरी सेंटरमध्ये अनेकदा लॉटरीचालक व ग्राहक यांच्यात वादविवाद होत असतात. त्यामुळे ते अतिशय अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असतात त्यामुळे बाजूला असलेल्या वस्तीतील महिला, वृद्ध, रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला, तरुण तरुणी यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी पोलीस प्रशासनाने दखल घेऊन गांधी चौक येथे असलेले लॉटरी सेंटर तात्काळ व शीघ्र प्रभावाने बंद करावे अशी मागणी गावातील नागरिकांनी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT