Arsh Mhaiskar sakal
नागपूर

Crime News : विद्यार्थ्याने विळ्याने चिरला स्वत:चा गळा! काय आहे कारण?

राग आल्याने विळ्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्त्या केल्याची मन सुन्न करणारी घटना उमरेड येथे घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उमरेड - ‘नेहमी मोबाईल पाहतो, अभ्यास का करीत नाही’, अशा शब्दात हटकल्याचा राग आल्याने विळ्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्त्या केल्याची मन सुन्न करणारी घटना उमरेड येथे घडली आहे. मुलगा ११ व्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे मुलाच्या वडिलाला मोठा मानसिक धक्का बसला.

भिवापूर तालुक्यातील बोटेझरी येथील महेंद्र सहादेव म्हैसकर (वय ५१) हे उमरेड येथील बस स्टॅंडच्या मागे राहणारे सुरेश रामटेके यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा अर्ष हा अकराव्या वर्गात विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. त्याला मोबाईल पाहण्याचे वेड होते. अभ्यास सोडून सतत मोबाईल पाहत असल्याने गुरूवारी रात्री महेंद्र अर्षवर रागावले होते.

वडील रागावल्याने अर्षने रागाच्या भरात बाथरूमध्ये जाऊन विळ्याने गळा कापून घेतला. वाराने नसा कापल्या जाऊन मोठा रक्तस्त्राव झाला आणि अर्षचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही भयंकर घटना उघडकीस आली. मुलाने उचललेल्या टोकाच्या पावलाने महेंद्र यांना मोठा मानसिक धक्काच बसला. आपल्या बोलण्याचा एवढा विपरीत परिणाम होईल, याची त्यांनी कल्पनाही केली नसावी.

मुलांमधील संयम दिवसेंदिवस कमी होत असून मुलांना हाताळताना पालकांची कसरत करावी लागत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. महेंद्र म्हैसकर यांच्या तोंडी तक्रारीवरून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिनेश खाटोले पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT