file photo 
नागपूर

ती सारखी तणावात राहायची; अखेर घडले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बारावीत कमी गुण मिळाल्‍यामुळे नैराश्‍यात गेलेल्‍या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. सीतालक्ष्मी शहाजी नायर (१८, डी-२२, रेल्वे क्वॉर्टर, अजनी) असे मृत युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहाजी नायर हे रेल्‍वे विभागात लोको पायलट पदावर नोकरी करतात. त्‍यांना दोन मुले असून मोठी मुलगी सीतालक्ष्‍मी बारावीत शिकते तर लहान मुलगा दहावीत आहे. सीतालक्ष्‍मी हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तिला वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते. त्‍यासाठी तिने बारावीत चांगला अभ्‍यास केला होता. मात्र, तिला ६५ टक्‍के मार्क मिळाले. त्‍यामुळे ती निराश झाली होती. 

गेल्‍या काही दिवसांपासून ती तणावात वावरत होती. तिने आईकडे कमी मार्क मिळाल्‍याची खंत बोलून दाखवली होती. कमी गुण मिळाल्‍यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात जाता येणार नाही. आपले स्‍वप्‍न पूर्ण होणार नाही. त्‍यामुळे ती आईकडे नेहमी रडत होती. आई प्रत्‍येक वेळी तिची समजूत घालत होती. सीतालक्ष्‍मीने बाथरूममध्ये लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. 
  
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT