The students did not receive a scholarship 
नागपूर

रांगेत लागून बँकेत खाते उघडले; मात्र रक्कम काही जमा होईचि ना...

मनीषा मोहोड

नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र, तीन वर्षांपासून ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेत; परंतु शिष्यवृत्तीचा रुपयाही त्यांच्या हाती लागला नाही. 

एकविसाव्या शतकातही ग्रामीण भागातील आदिवासींचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना. 2011मध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेतर्फे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एक हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार रुपये, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेसाठी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे संपूर्ण दस्तऐवजांसह अर्ज सादर केलेत. अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. 

पूर्वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शाळेच्या खात्यात जमा होत होती. मुख्याध्यापक ती विद्यार्थ्यांना देत असे. मात्र, 2015 रोजी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी बॅंकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले. योजनेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी रक्कम खर्च करून तालुकास्थळी जाऊन बॅंकेत खाते उघडले. मात्र, अद्याप त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली नाही. शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालक, विद्यार्थी आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्य चकरा मारत आहेत. शाळेतील मुख्याध्यापक बॅंकेकडे जाण्यास सांगतात. तर, बॅंक अधिकारी अजूनही पैसे आले नाही, असे सांगून परत पाठवतात.

नागपूर विभागात हजारो विद्यार्थी वंचित

2015-16मध्ये राज्यभरात सुमारे 17 लाख आदिवासी विद्यार्थ्यांनी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यापैकी एकाच्याही खात्यात अद्यापपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नाही. नागपूर प्रकल्पात 2015-16 मधील 3418 विद्यार्थ्यांना 48 लाख 32 हजार व 2016-17 मधील 10 हजार 652 विद्यार्थ्यांना 1 कोटी 44 लाख 500 रुपये सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे वाटप प्रलंबित आहे. आतापर्यंत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची कोट्यवधी रक्कम प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

काम पुढे ढकलण्यात येते
आदिवासी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, यासाठी वारंवार जिल्हा परिषद स्तरावर मागणी व पाठपुरावा केला; परंतु प्रत्येक वेळी कार्यालयीन कारण सांगून काम पुढे ढकलण्यात येते. 2015-16पासून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेत; तरीही पैसे मिळाले नसल्याची स्थिती आहे. 
-प्रमोद रेवतकर,
मार्गदर्शक, विदर्भ आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT