Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University sakal
नागपूर

Nagpur University : विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा! विद्यापीठाची नव्या सत्रापासून ७ टक्के शुल्कवाढ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून शुल्कात ७ टक्के वाढ करण्याचा २०२३ चा निर्णय कायम ठेवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून शुल्कात ७ टक्के वाढ करण्याचा २०२३ चा निर्णय कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाने सोमवारी (ता.१) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. हे सुधारित शुल्क फक्त सत्र २०२४-२५ मध्ये पहिल्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू होईल. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे.

दरवर्षी ७ टक्के फी वाढ लागू करण्याबाबत विद्यापीठाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती. यामुळे २२ मे २०२४ रोजी झालेल्या शैक्षणिक परिषद आणि २७ जून २०२४ रोजी झालेल्या प्रशासकीय परिषदेत २०२३ चा निर्णय कायम ठेवत ७ टक्के फी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१६ पासून विद्यापीठाने प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केलेली नाही.

संघटना चालकांकडून फी वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे २०२३ मध्ये झालेल्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत फी वाढीवरील बंदी उठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि ही बंदी हटवण्यात आली. त्यानुसार प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत फीमध्ये २० टक्के वाढ करून दरवर्षी ७ टक्के फी वाढ करण्याचा प्रस्ताव फी निर्धारण समितीने मांडला आणि २०२४-२५ पासून दरवर्षी ७ टक्के फी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र, प्रशासनाचा या निर्णयाविरोधात युवा मोर्चा आणि विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाला घेरले होते. त्यामुळे विद्यापीठाने शुल्कवाढ न करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने तातडीच्या व्यवस्थापन बैठकीत त्याला मान्यता दिली. दरम्यान याबाबत कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

विहित शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारू नका

या अधिसूचनेत नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना शुल्क वाढीनुसार विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या सत्रासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून जुने शुल्क घेतले असेल, तर या विद्यार्थ्यांकडून नव्या अधिसूचनेनुसार शुल्क आकारण्यात यावे.

विनाअनुदानित महाविद्यालयाचे शुल्क

  • क्रीडा निधी ३४ रुपये

  • अश्वमेध ३६ रुपये

  • मेडिकल ८५ रुपये

  • विद्यार्थी मदत १३२ रुपये

  • विमा निधी ४० रुपये

  • ओळखपत्र शुल्क- २८ रुपये

विनाअनुदानित कॉलेज कोर्स फी

  • बीए, बीकॉम,बीबीए - १ हजार ४३६ रुपये

  • एमए, एमएसडब्ल्यू, एमए मास कम्युनिकेशन - १हजार ५४६ रुपये

  • बीएससी, बीटीसी - १ हजार ६८३ रुपये

  • एमसीएम, एमएसस्सी, एमएसस्सी होम सायन्स - १ हजार ८२० रुपये

  • एमसीएम (विद्यापीठ विभाग) – ९०६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT