Students tend to which branch for degree admission 
नागपूर

पदवी प्रवेशासाठी विद्यार्थी देताहेत या शाखेला पसंती, जाणून घ्या

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावरील नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ६२ हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी ५२ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे.

विद्यापीठाने यावर्षी पदवी प्रवेशासाठी प्रथमच संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी आणि दहावी आणि बारावीची गुणपत्रिका अपलोड करण्याचे अनिवार्य केले आहे. याला प्राचार्य फोरमसह प्राधिकरण सदस्यांनी विरोध दर्शवला. तसेच, पदव्युत्तर प्रवेशामध्ये ऑनलाइन प्रवेश केल्याने महाविद्यालयांना फटका बसल्याची बाब समोर केली.

कोरोना काळात टाळेबंदी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल असेही सांगण्यात आले. मात्र, १७ जुलैपासून सुरू झालेल्या नोंदणीचा आकडा ६२ हजारावर गेला आहे. १२ ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षीही विज्ञान आणि वाणिज्य या पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.


अशी आहेत कारणे
कोरोना संक्रमणामुळे राज्यात एमएचसीईटी तर देशभरात जेईई, नीट आणि इतर प्रवेश पात्रता परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यात एमएचसीईटीबाबत अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही. प्रवेश पात्रता परीक्षा घेणे शक्य झाले तरी, नियमित वर्ग होतील का याबाबत साशंकता आहे. या अडचणींमुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे निदान पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी नोंदणी करण्यात येत असल्याचे दिसून येते.

शाखा - जागा

  • कला - ४0,000,
  • वाणिज्य -३0,000,
  • विज्ञान - ३५,000,
  • गृहविज्ञान - ४00
  • गृहअर्थशास्त्र - ५00

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT