Free Textbo sakal
नागपूर

Free Textbooks Scheme : विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके ; प्रशासनाचे नियोजन

१ जुलैपासून शाळा सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे. ग्रामीण भागातील १.५४ लाख विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तके योजनेचा लाभ मिळणार असून १५ मेपासून बालभारतीतून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पोहचती होतील.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : १ जुलैपासून शाळा सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे. ग्रामीण भागातील १.५४ लाख विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तके योजनेचा लाभ मिळणार असून १५ मेपासून बालभारतीतून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पोहचती होतील.

शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती पुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन सुरू आहे. बालभारतीकडे पुस्तकांसाठी ऑनलाइन नोंदणीही करण्यात आली होती.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५४ हजार ३२ वर विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पाठ्य पुस्तकांची नोंदणी फेब्रुवारी महिन्यातच बालभारतीकडे करण्यात आली. शाळांनी भरलेल्या युडाएस माहितीनुसार पहिली ते पाचवीपर्यंत ९३ हजार ७८, सहावी ते आठवीपर्यंत ६० हजार ९५४, अशी एकूण १ लाख ५४ हजार ३२ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.

शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ मे २०२४ पासून बालभारतीच्या बुटीबोरी डेपोतून पुस्तकांची उचल करून तालुकास्तरावर वितरणही होईल. त्यानंतर तेथून पुस्तके शाळास्तरावर वितरित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT