subhash chaudhari 
नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. ८) जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांचा कार्यकाळ दिनांक ७ एप्रिल रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. कानपूरच्या इंडियन इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ संजय चहांदे हे समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या ३० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांना पाच उमेदवारांची नावे देण्यात आली होती. त्यात डॉ. सुभाष चौधरी यांच्यासह माजी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, नांदेड येथील डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. मोहनलाल कोल्हे आणि मुंबई येथील डॉ. सुनील भागवत यांच्या समावेश होता. त्यांच्यापैकी एका नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, राज्यपालांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज डॉ. सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

कोण आहेत डॉ. सुभाष चौधरी
डॉ. सुभाष चौधरी (जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.(जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्राचा व्यापक अनुभव आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup मध्येही वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम! बांगलादेशविरुद्ध अर्धशतक पूर्ण करताच रचला नवा इतिहास

Maharashtra Municipal Elections 2026 : नगरसेवक तर निवडून आले पण महापौर पदाचं काय? कधी जाहीर होणार आरक्षण? वाचा...

Latest Marathi News Live Update : महापालिकेतला कौल जनतेचा नाही तर सत्तेच्या गैरवापराचा, विश्वजीत कदमांची भाजपवर टीका

Kolhapur vote : सर्वांत लहान नगरसेविका ते अनवाणी प्रचाराचा संघर्ष; मतमोजणी केंद्रातील मानवी कथा

Lakshmi Niwas New Promo: ती चूक नडणार! अखेर जयंत - जान्हवी समोरासमोर येणार; मालिकेत पुढे काय घडणार?

SCROLL FOR NEXT