hospital sakal
नागपूर

सुपर स्पेशालिटीचे ‘हार्ट फेल’; कॅथलॅब बंद

एकिकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात डीएम अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

केवल जीवनतारे

नागपूर : एकिकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात डीएम अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ही विदर्भासहित मध्यभारतासाठी भूषणावह बाब असताना मागील आठ दिवसांपासून सुपर स्पेशालिटीमधील कॅथलॅब बंद पडली आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या हृदयावर होणाऱ्या ऍन्जिओप्लॉस्टीच्या प्रक्रिया ८ दिवसांपासून थांबल्या आहेत. या वर्षभरात सुपरचे चौथ्यांदा हार्ट फेल झाले आहे.

सुपर स्पेशाटिलीमध्ये कॅथलॅब, फॅब्रोस्कॅनसह ९९ प्रकारच्या यंत्रसामुग्री आहेत. यंत्राची वॉरंटी संपल्यानंतर या यंत्रांच्या देखभालीसाठी दरवर्षी दीड कोटी रुपयाच्या निधीची गरज आहे. यासाठी सीएनसी,एएनसी करावी लागते. मात्र मागील विदर्भातील शासकीय रुग्णालयांतील यंत्रांच्या देखभालीचा निधी राज्य शासनाकडून मिळत नाही. कंपनीशी एएनसी आणि सीएनसीचा करार यामुळे आपोआपच संपुष्टात येतो. यामुळे कॅथलॅब किंवा इतर यंत्र बंद पडल्यानतंर मात्र कंपनीकडून यंत्र दुरुस्तीसाठी अडवणूक करण्यात येते.

आठ दिवसांपासून कॅथलॅब बंद पडून आहे. मात्र कंपनीकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. दीड कोटीची गरज असल्यानंतर अवघेच ६ ते ७ लाखाचा निधी देऊन बोळवण केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.मात्र याचा फटका गरीब रुग्णांना बसतो. आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तरांचल अशा पाच राज्यातून आलेले रुग्ण आल्या पावली परत जात आहेत. आठ दिवसांत सुमारे १०० पेक्षा अधिक गरिबांच्या एन्जिओग्राफी होऊ शकल्या नाहीत, तर ३२ जणांच्या एन्जिओप्लास्टी होऊ शकल्या नाही.

जीव गमवल्यास जबाबदारी कोणाची?

सुपरमध्ये १९९८ पासून आजतागायत सुमारे ४० हजारावर गरीब रुग्णांच्या हृदयावर ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टीच्या प्रक्रिया झाल्या आहेत. गरिबांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया सातत्याने सुरु आहेत. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून सुपर स्पेशालिटीच्या हृदयरोग विभागात सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये खर्चून नवीन कॅथलॅब लावली आहे. "एफपीडी', "एफएफआर', "आयव्हीयुएस' सारख्या गुणात्मक बदलातून सूपरचा हृदय विभाग ठणठणीत झाला आहे. इमर्जन्सी ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टीचे फायदे गरीब रुग्णांना होत आहे, मात्र ८ दिवसांपासून कॅथलॅब बंद आहे. याचा फटका गरिबांना बसतो. त्यांचे हृदय धोक्‍यात आले आहे. येथील हृदयरोग विभागात ऍन्जिओप्लॉस्टीअभावी गरीब रुग्णाचा जीव गमवावा लागल्यास जबाबदारी कोण घेणार हा सवाल मात्र अनुत्तरीत आहे.

कॅथलॅब बंदचा परिणाम

-८ दिवसात १०० गरिबांवर एन्जिओग्राफी प्रक्रिया झाल्या नाहीत.

-८ दिवसात ३२ गरिबांच्या एन्जिओप्लास्टीच्या प्रक्रिया झाल्या नाहीत.

सुपरचे आर्थिक नुकसान

-एन्जिओग्राफी - २ लाख ५० हजार रुपये

-एन्जिओप्लास्टी -३२ लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT