Super speciality hospital will build in North Nagpur said Nitin Raut  
नागपूर

उत्तर नागपुरात लवकरच होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची घोषणा 

राजेश चरपे

नागपूर ः उत्तर नागपूरमध्ये ७०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभारले जाणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली.

डॉ. राऊत यांच्या हस्ते आज उत्तर नागपुरात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. या विकास कामांवर १ कोटी १२ लाख रुपये खर्च होणार आहेत. यावेळी ते बोलत होते. मौजा वांजरी येथील हमीदनगरात मुस्लिम कब्रस्तान येथे सिमेंट रस्त्याचे (२०.१७ लाख) भूमिपूजन, मौज बिनाकीतील इंदिरानगरात संरक्षण भिंतीचे (१५.४० लाख) बांधकाम, मौजा बिनाकी येथील सिमेंट रस्त्याचे बांधकाम (१०.७८ लाख), मौजा नारी येथील मानवनगरात सुरेश पाटील व वर्षा शामकुळे यांच्या घरासमोर सिमेंटचा रस्ता (४८.४१ लाख) व मौजा इंदोरा येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयासमोरील नागपूर स्लम को-आप. हाउसिंग सोसायटीत समाज भवनाच्या (१८.०७ लाख) भूमिपूजन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, उत्तर नागपूरमध्ये अत्याधुनिक सोयींनी युक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जाणार आहे. यामुळे चांगल्या आरोग्य सुविधांसाठी उत्तर नागपुरातील लोकांना आता मेडिकलवर अवलंबून राहावे लागणार नाही. 

एवढेच नव्हे तर या हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस व एमडीनंतर करावयाचे २६ अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले जाणार आहे. चंडीगड येथील ऑल इंडिया मेडीकल सायन्सेसच्या धर्तीवर हे हॉस्पिटल राहणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT