Super Specialty Hospital Robbery of poor patients in cardiology department nagpur sakal
नागपूर

नागपूर : सुपरच्या हृदयशल्य विभागात गरीब रुग्णांची लूट

महात्मा फुले योजनेतून निधी मंजुरीनंतरही साहित्य खरेदीची सक्ती

केवल जीवनतारे @kewalsakal

नागपूर : नाव संजय...(बदललेले नाव). वय चाळीसच्या आसपास...अंगावर मळकट कपडे...महिन्याभरापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्य विभागात (सीव्हिटीएस) शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. गरीब असल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सव्वालाख रुपये मंजूर झाले. तरीही त्यांना हजारो रुपयांचे साहित्य बाहेरून खरेदी करण्यास सांगितले आहे. यावरून सुपरमध्येही रुग्णांची लूट सुरू असल्याचे उघड झाले आहे.

महात्मा फुले योजनेतून निधी मंजूर झाल्याने संजय यांना एक रुपयादेखील खर्च येऊ नये. मात्र, त्यांना १७ हजारांचे शस्त्रक्रियेचे साहित्य बाहेरून खरेदी करण्यासाठी त्यांच्या हाती चिठ्ठी दिली. सुपरच्या सीव्हिटीएस वॉर्डात ‘ऑन दी स्पॉट’ पंचनामा केला असता येथे दाखल असलेल्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार मिळत असतानाही त्यांना खासगी मेडिकल स्टोअरमधून हजारो रुपयांचे सर्जिकल साहित्य, औषधे खरेदीची सक्ती डॉक्टरांकडून केली जात असल्याचे विदारक वास्तव पुढे आले. विशेष असे की, सर्व रुग्णांजवळ एकाच मेडिकल स्टोअरची बिले दिसली.

तळागाळातील गोरगरीब रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय वरदान ठरले आहे. यामुळेच सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला दीड हजार रग्णांची नोंद होते. हृदयविकार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्यूरॉलॉजी, नेफ्रोलॉजी, सीव्हीटीएस विभागात गंभीर रुग्ण उपचारासाठी महाराष्ट्रातील वाशीमपासून येतात. याशिवाय आंध्रप्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, मध्यप्रदेशातूनही रुग्ण येतात. मात्र सुपरमधील तज्ज्ञ डॉक्टर सर्व नियमांना डावलून धडधडीतपणे बेकायदेशीरपद्धतीने रुग्णांवर साहित्य खरेदीची सक्ती करतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या रुग्णांना लाख सव्वालाख रुपये मंजूर होतात, त्यानंतरही कोणी १० हजाराचे तर कोणी रुग्ण ५ हजार रुपयांचे साहित्य खरेदी करून आणतात. अशा पद्धतीने गरीब रुग्णांची आर्थिक लूट होत असताना मेडिकलचे प्रशासन उघड्या डोळ्यांनी हा सारा खेळ पाहत आहे.

सर्वांकडे एकाच मेडिकलची बिले!

सुपर स्पेशालिटीतील ‘सीव्हिटीएस वॉर्ड’ हाउसफुल्ल होता. प्रत्येक रुग्णांच्या हाती ‘प्रीस्क्रिप्शन'' दिसत होते. तेही ब्रॅन्डेड औषधांचे. औषधांची बिले पाहिली असता साऱ्यांकडे ‘विनायक मेडिकल स्टोअर’ची बिले होती. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या परिसरात राज्य आणि केंद्र शासनाच्या सुचनांप्रमाणे तीन मेडिकल स्टोअर उघडण्यात आली आहेत. यातील एकाही स्टोअरमधून औषधे किंवा सर्जिकल साहित्य खरेदी केली जात नसल्याचे उघड झाले. सुपरच्या बाहेर असलेल्या एकाच मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णाचे नातेवाईक रखरखत्या उन्हात औषध खरेदीसाठी जात असल्याचे दिसून आले. यासंदर्भात सुपरचे विशेष कार्यअधिकारी डॉ. संजय पराते यांच्याशी संपर्क साधला पण तो संपर्क होऊ शकला नाही.

सुपर स्पेशालिटीत हृदयावरील सर्जरीच्या रुग्णांची महात्मा जनआरोग्य योजनेतून केस मंजूर झाल्यानंतर रुग्णांनी खासगी औषधालयातून औषधे खरेदी करू नये. यासंदर्भात आपल्याकडे रीतसर अशी तक्रार दाखल झाली नाही. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? राज तर सोडा, उद्धव सोबतही आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

Latest Marathi News Live Update : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

SCROLL FOR NEXT