surprise, Mayor Sandeep Joshi backing Commissioner Mundhe 
नागपूर

आश्‍चर्य, आयुक्त मुंढेंच्या पाठीशी महापौर संदीप जोशी

राजेश प्रायकर

नागपूर : 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने शिथिलता देत काही बंधने घातली. मात्र, नागपूरकर बेफिकिर दिसून येत असून पुन्हा 'लॉकडाऊन' करण्याच्या आयुक्तांच्या इशाऱ्याला समर्थन असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी नमुद केले. परंतु पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी सूचनाही महापौरांनी केली. 


आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर संचारबंदी लागू करावी लागेल, असा इशारा दिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात नागरिकांनी नियम पाळले नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली, हे वास्तव असून आयुक्तांच्या मताशी पूर्णतः सहमत असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

सवलतीचा गैरफायदा घेत नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णय स्वागतार्ह आहे. पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे नुकसान होणार आहे.

परिस्थिती जर आटोक्‍याबाहेर जात असेल तर निश्‍चितच संचारबंदीचा निर्णय घ्यायला हवा. परंतु हा निर्णय घेताना मनपा आयुक्तांनी या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला विश्वासात घ्यावे. संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी.

कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी. या कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी, लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे प्रशासनाच्या सोबत राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी नमुद केले. 

संयुक्तपणे शहर दौऱ्याचा प्रस्ताव 
लॉकडाऊनसाठी शहरातील स्थितीची पाहणी करण्याकरिता आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा. जे व्यापारी नियम पाळत नाहीत अशा बाजारपेठामध्ये महापौर आणि आयुक्त संयुक्तरित्या फिरल्यास त्यातून एक वेगळा संदेश जाईल. परिणामही होईल. यामुळे कदाचित संचारबंदी लागू करण्याची वेळही येणार नाही, असेही महापौर म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT