survey revealed political party activists angry over BJP leaders and former corporators politics nagpur esakal
नागपूर

Nagpur : ‘गरम केटल्यांचा’ भाजप कार्यकर्त्यांना चटका; नेत्यांच्या पीएंवर नाराजी

नेत्यांच्या पीएंवर कार्यकर्त्यांची सर्वाधिक नाराजी; सर्वेने उडाली झोप!

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपच्या नेते व माजी नगरसेवकांवर सर्वसामान्यांपेक्षा स्वपक्षाचे कार्यकर्तेच अधिक नाराज असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. नेते आणि कार्यकर्त्यांमधील या दुराव्याला नेत्यांच्या ‘पीएंना’ जबाबदार ठरवल्याने चहापेक्षा गरम असलेल्या या केटल्यांना शांत कसे करायचे, असा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.

महापालिका, लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. आगामी निवडणुकीत पक्षाचे आणि उमेदवारांचे भवितव्य काय राहील याकरिता पक्षाच्यावतीने एक गोपनीय सर्वे करण्यात आला होता. या सर्वेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचेसुद्धा मत जाणून घेण्यात आले. त्यात नेत्यांचे ‘पी.ए.’ विरोधात खदखद व्यक्त करण्यात आली.

कामे करणे तर सोडा मात्र काही पीए नेत्यांना भेटू देत नाहीत, बोलू देत नाहीत, अशी सामूहिक तक्रार अनेक कार्यकर्त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता भाकरी फिरवयाची असेल तर नेत्यांच्या पीएंचीच फिरवावी लागेल असे एकूण भाजपमध्ये बोलले जात आहे.

नागपूर महापालिकेत सुमारे पंधरा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. या दरम्यान शहराचा मोठा विकास झाला हे सर्वच मान्य करतात. मात्र फक्त विकासावर भाजपचे नगरसेवक निवडून येतील याची खात्री कोणालाच नाही.

चारच्या प्रभागामुळे अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर फिरकलेच नाहीत. छोटी-छोटी कामेही होत नसल्याची नाराजी आहे. नगरसेवक दिसत नाही आणि आमदार, नेत्यांपर्यंत त्यांचे सहाय्यक पोहचू देत नाही त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा नाराज आहेत.

कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता गमावावी लागली. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालल्याने भाजपच्या नेत्यांना सावध राहावे लागणार असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT