heart-attack- 
नागपूर

तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने! उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने जनमानस धास्तावले आहे. मात्र आरोग्य विभागात काम करणारी मंडळी आपले काम चोख बजावत आहेत. त्यातच उपराजधानीत दिवसेंदिवस सूर्य आग ओकतो आहे. कोरोना सर्वेक्षण करणा-यांवर कामाचा खूप ताण आहे. अशातच काम करायला घराबाहेर पडणा-या त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला असेल, या विचाराने सगळे अस्वस्थ झाले.
आशा सेविकांसोबत कोरोना सर्वेक्षण पथकातील महापालिकेचा कर्मचारी आज सकाळी दगावल्याने खळबळ माजली. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिकेच्या गांधीबाग झोनअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी आशा सेविकांसोबत समुंद्रे या सफाई कर्मचाऱ्याचाही पथकात समावेश होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणेच कामावर जाण्यास निघाला असताना घरीच छातीत दुखून आल्याने कोसळला. त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे निदान झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाचणी करण्यात आली. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांत खळबळ माजली. कर्मचाऱ्यांत कुजबूज सुरू असतानाच त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

काही दिवसांपासून समुंद्रे यांना बरे नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. छातीतील दुखणे ऍसिडिटीचा त्रास असेल, असे समजून समुंद्रे यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वीही त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! गाड्या दीड तास उशिरा, प्रवाशी रुळांवर; Video

राज्यातलं सरकार 'झाडखाऊ'! भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक, राज ठाकरे घेणार सभा...

LPG Cylinder Update: दिवाळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार? आंदोलनामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढणार? पाहा ताजी अपडेट

Maharashtra Live News : देशभरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर- राज ठाकरे

सँडल घालताच पायांची टॅनिंग दिसते? घरीच पेडिक्युअर करताना पाण्यात मिसळा 'या' ७ घरगुती गोष्टी; पायांना बनवा स्वच्छ अन् मऊ!

SCROLL FOR NEXT