Satranjipura 
नागपूर

सतरंजीपुऱ्यानंतर नागपूरच्या या भागातील नागरिकांनाही विलगीकरणात नेण्याची प्रक्रिया सुरू...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सतरंजीपुऱ्यातील कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंर नागपुरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंर प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचललायला सुरुवात केली. तरीदेखील सतरंजीपुऱ्यातील परिस्थती हातात येत नसल्याने संपूर्ण परिसर सिल करण्यात आला. तरिदेखील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासननाने अखेर संपूर्ण सतरंजीपुऱ्यातील नागरिकांनी विलगीकरणात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यापाठोपाठ आणखी एका परिसरातील नागरिकांना सुद्धा विलगीकरणात दाखल करणे सुरू झाले आहे. 

मोमीनपुऱ्यातील एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर महापालिकेने येथील नागरिकांनाही विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी या परिसरातील सुमारे पन्नासवर नागरिकांना मनपा अधिकाऱ्यांनी विलगीकरणात पाठवले.

बुधवारी मोमीनपुरा येथील एका सत्तर वर्षीय वृद्धाचा कोरोना संसर्गमुळे मृत्यू झाला. या घटनेने महापालिका प्रशासन हादरले असून मोमीनपुऱ्यातील नागरिकांनाही विलगीकरण केंद्रात पाठविण्यासाठी पाऊले उचलली. या भागातूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधितांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात अनेकजण आले असण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे मनपाने उचलले पाऊल 
या पार्श्वभूमीवर महापालिकेने शुक्रवारी या भागातील नागरिकांनाही विलगीकरणात पाठविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. सतरंजीपुऱ्यात कोरोनाबाधिताचा मृत्यू अन् दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या यामुळे येथील नागरिकांना सक्तीने विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. आता मात्र महापालिकेने मोमीनपुऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT