file 
नागपूर

जादूटोणा केल्याचा संशय आला आणि उचलले टोकाचे पाउल...

सकाळ वृत्तसेवा


कुही (जि.नागपूर)  :  कुहीवरून दक्षिणेस सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसळगाव येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून शुक्रवारी (ता.6) सायंकाळी सहाच्या सुमारास चौघांनी एका व्यक्‍तीची हत्या केली.


भुजाडे परिवारातील चौघांना अटक
विद्याधर रंगारी (वय 45, मुसळगाव) असे मृताचे नाव आहे. कुही पोलिसांनी या खुनाच्या आरोपात मुसळगाव येथील देवेंद्र भुजाडे, विनोद भुजाडे, धर्मेंद्र भुजाडे, श्रीधर भुजाडे यांना अटक केली आहे, अशी माहिती कुहीचे ठाणेदार मदने यांनी दिली. कुही पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुसळगाव येथे विद्याधर रंगारी पानठेला चालवित होते. घटनेच्या वेळी तो पानठेल्यावर होते. त्यांनी जादूटोणा केला असावा अशा संशयावरून भुजाडे व रंगारी यांच्यात भांडण झाले. तेव्हा भुजाडेंनी विद्याधरला पानठेल्यातून ओढत बाहेर आणून लाठ्याकाठ्यांनी मारले. त्यात विद्याधरचा जीव गेला.
घटनेची माहिती मिळताच कुहीचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. खुनाच्या आरोपाखाली चौघांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास उमरेडच्या उपविभागीय पोलिस अधीक्षक पौर्णिमा तावरे करीत आहेत.


सुनेचा अत्याचार केला अन्‌ कारावासात पोहचला
कामठी (जि.नागपूर)  : कुंभारे कॉलनी छत्रपतीनगर येथील नराधम सासऱ्याने सून घरात एकटी असल्याची संधी साधून बळजबरीने लैंगिक कृत्य केल्याची घटना 3 मार्च 2017 ला दुपारी 3 वाजता घडली. यातील पीडित सुनेने स्थानिक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सासऱ्याविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यातील प्रकरणाची शनिवारी (ता.7) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात झालेल्या न्यायालयीन सुनावणीत न्यायाधीश व्ही. एम. गायकवाड यांनी आरोपी सासऱ्याला वर्षभराची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 3 हजार रुपये दंड ठोठावला. शिक्षा झालेल्या आरोपी सासऱ्याचे नाव सिद्धार्थ असे आहे. न्यायाधीश व्ही. एम. गायकवाड यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT