Sword and car seized from gangster Safelkar PCR extended till April 12 
नागपूर

गॅंगस्टर सफेलकरकडून तलवार, कार जप्त; पीसीआर १२ एप्रिलपर्यंत वाढविला

अनिल कांबळे

नागपूर : कामठीतील गॅंगस्टर रणजित सफेलकरने मनीष श्रीवास हत्याकांडासाठी उपयोगात आणलेली कार आणि शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेली तलवार गुन्हे शाखेने जप्त केली. रणजितला गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत १२ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. रणजितच्या अटकेमुळे कामठीत आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे, हे विशेष.

राज्यातील बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेल्या सफेलकरने नागपूर आणि कामठीत अनेकांच्या जमिनी हडपल्या आहेत. निमगडे यांचे हत्याकांड घडविण्यासाठी एका ‘बिग बॉस’कडून पाच कोटींची सुपारी घेतली होती. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने निमगडे हत्याकांडाचा सहा वर्षे छडा लागला नव्हता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुपारी किलर रणजितसह १४ जणांना ताब्यात घेतले होते. सध्या सफेलकर अटकेत आहे.

जाणून घ्या - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात
 
४ मार्च २०१२ मध्ये महिलेचे आमिष दाखवून आरोपी सफेलकर, शरद ऊर्फ कालू हाटे, भरत हाटे आणि त्यांच्या साथीदारांनी मनीषचे अपहरण करून नंतर तलवारीने गळा चिरला. पोलिसांनी बुधवारी खुनासाठी वापरण्यात आलेली तलवार, महिलेची वाहतूक करण्यापासून ते मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत वापरलेल्या चार कार जप्त केल्या आहेत. आरोपींचे मोबाईलही जप्त केले. आरोपींचे व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद व इतर माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी दिली.

दरम्यान, मौजा वांजरा येथील भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा भूखंड कुकडे यांच्या मालकीचा आहे. त्यांनी अजय चन्नोर यांच्या नावे आममुखत्यारपत्र करून दिले. या भूखंडाच्या ताब्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. याशिवाय कळमना व गुन्हे शाखा पोलिसांकडेही तक्रारी करण्यात आल्या. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

रणजित सफेलकरशी कोणताही संबंध नसताना पोलिसांनी आम्हाला त्याचे साथीदार दाखविले. सफेलकरसह अजय चन्नोर, संजय कारोंडे व राकेश काळे यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल केले. आमचा ले-आउटचा व्यवसाय आहे. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी संजय कारोंडे यांनी प्रसिद्धिपत्रकात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT