Sword attacks on mother and son in rural Nagpur 
नागपूर

कौटुंबिक कलहातून माय-लेकावर तलवारीने प्राणघातक हल्ला; लग्नाला जाणे भोवले

संदीप भुयार

कळमेश्वर (जि. नागपूर) : हिवरा येथे भासऱ्याकडे झालेल्या लग्नाला का आले, या क्षुल्लक कारणावरून दिराने वहिनी व पुतण्यावर तलवारीने हल्ला चढवीत इतर साथीदारांनी काठीने मारहाण केली. यात महिलेला तलवारीचे गंभीर घाव लागले. मंदा किसना कोठोडे (वय ४८) व मुलगा सुमीत किसना कोठोडे (वय १७, रा. कुणबी मोहल्ल वॉर्ड क्र. १ धापेवाडा) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ कोठोडे, किसना कोठोड (पती) व मंगेश शेशराव कोठोडे (दोन्ही रा. धापेवाडा) असे तीन भाऊ असून, पती किसना कोठोडे हा व्यसनाधीन आहे. तो लहान भाऊ मंगेशसोबत राहतो. दोन वर्षांअगोदर किसना कोठोडे याने पत्नी मंदा कोठोडे, मोठा मुलगा सुमीत कोठोडे व लहान मुलगा यश कोठोडे यास घराबाहेर हाकलून दिले. सांगण्यात येते की, व्यसनाच्या नशेत पती किसना कोठोडे याने वडिलोपार्जित घर भाऊ मंगेश कोठोडे यांच्या नावाने करून दिले.

तेव्हापासून मंदाबाई सुमीत व यश मुलांसह धापेवाडा कुणबीपुरा वॉर्ड क्र. एक येथे किरायाने राहत असून, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. रविवारी मंदाबाई भासऱ्याकडील लग्नात सहभागी होण्यास गेल्या. सोमवारी मंदाबाईचा दीर मंगेश याने तिच्या घरी जाऊन तलवारीने हल्ला चढविला तर मंगेशचा मुलगा लोकेश तसेच मंगेश कोठोडे याचे भाचे सचिन वैद्य, शुभम ढोले, व गौरव ढोले यांनी मंदाबाईचा मोठा मुलगा सुमीत किसन कोठोडे यांच्यावर लाठीकाठीने हल्ला केला.

यावेळी मंदाबाई कोठोडे यांचा लहान मुलगा यश हा कामानिमित्त घराबाहेर होता. या मारहाणीत मंदाबाई तलवारीच्या वारांनी जखमी झाल्या. जखमी झालेल्या मंदाबाईला सावनेर रुग्णालयात उपचार करण्यात आला. मुलगा सुमीत यास चांगलाच मार लागला. या घटनेची अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

हात, मान व कंबरेला घाव

शनिवारी मंदाबाई भासऱ्याकडील विवाह समारंभात सहभागी झाली होती. रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मंदाबाईचा दीर मंगेश कोठोडे याने तिच्या घरी जाऊन तलवारीने हल्ला चढविला तर मंगेशचा मुलगा लोकेश व भाचे सचिन वैद्य, शुभम ढोले व गौरव ढोले यांनी मंदाबाईचा थोरला मुलगा सुमीत किसना कोठोडे याच्यावर लाठीकाठीने हल्ला चढविला. या मारहाणीत मंदाबाईच्या हात, मान व कंबरेला घाव लागले.

मामीसह तिच्या मुलांकडूनच हल्ला

मामाला मामी व दोन्ही मुले मारहाण करीत असल्याची माहिती मिळाल्याने मामाच्या बचावासाठी त्यांच्या घरी गेलो असता मामी व मुलांनीच आम्हाला मारहाण केल्याची तक्रार गौरव लवुजी ढोले (वय २३, रा. धापेवाडा) याने कळमेश्‍वर पोलिसात केली. याप्रकरणी महिलेसह मुलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT