nagpur uniersity sakal
नागपूर

विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुसाट

सहा महिन्यांत होणार पूर्ण, नागपूरकर धावपटूंसाठी दुहेरी गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (nagpur university)मैदानावरील अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकचे ( synthetic tracks)काम वेगाने सुरू असून, येत्या सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या धावपटूंना आता लवकरच सरावासाठी स्वतःचा व हक्काचा ट्रॅक मिळणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या धावपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक असावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (central minister nitin gadkari)यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर ट्रॅकच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

बांधकाम झपाट्याने सुरू असून, सहा महिन्यांत म्हणजेच येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. सूर्यवंशी म्हणाले, ड्रेनेजचे काम शेवटच्या टप्प्यात असून, उर्वरित कामही ''नॉन स्टॉप'' सुरू आहे. त्यामुळे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जुन्या शिंडर ट्रॅकमध्ये असलेले दोषही दूर करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

जवळपास साडेदहा कोटी रुपये खर्च करून व विद्यापीठाच्या स्वतःच्या पैशातून बांधण्यात येत असलेल्या या ट्रॅकच्या बांधकामाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईस्थित ‘स्पोर्ट्स फॅसिलिटीज’कडे सोपविण्यात आले आहे. एकूण आठ लेन असलेल्या या ट्रॅकच्या बाजूला लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन ‘जम्पिंग पीट’ राहणार आहे. तसेच मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाईट्‌सची व्यवस्था आणि हातोडा व गोळाफेकीसाठी विशेष प्रकारचा पिंजरा राहणार आहे.

''विद्यापीठाचा स्वतःचा (nagpur university)सिंथेटिक ट्रॅक असावा, अशी आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. उशिरा का होईना ट्रॅकचे बांधकाम सुरू झाले आहे. प्रगतिपथावर असलेले हे काम निर्धारित वेळेत व्हावे, यासाठी कुलगुरूंसह सर्व जण प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ट्रॅक पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.''

-डॉ. शरद सूर्यवंशी, (संचालक, शारीरिक शिक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT