नागपूर

तालिबानीयांच्या टोळीत नागपुरातील अफगाणी; १६ जूनला केली होती अटक

अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीत टुरिस्ट व्हिसावर आलेला अफगाणी नागरिक थेट तालिबानी संघटनेचा सदस्य निघाला. त्याला नागपूर पोलिसांनी १६ जूनला अटक केली होती. त्याची दूतावासाच्या मदतीने अफगाणिस्तानात रवानगी केली होती. त्याचे फोटो नागपूर पोलिसांच्या हाती लागले असून, सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी नागपुरात नूर मोहम्मद ऊर्फ अब्दुल हक हा तालिबानी संघटनेशी जुळलेला होता. १० वर्षांपासून तो नागपुरात राहत होता. तो टुरिस्ट व्हिसावर आला होता. नागपुरात लपून राहणाऱ्या नूर मोहम्मदने चांगली मायाही जमवली होती. तो तालिबानी संघटनांचे फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करीत होता. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या तो रडारवर आला. त्याला १६ जूनला पोलिसांनी अटक केली. त्याच्या शरीरावर गोळी लागल्याचे निशाण होते. मुजाहिदांच्या समर्थनार्थ त्याचा व्हिडिओ आणि एलएमजी गनसोबत त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो नागपूर पोलिसांच्‍याही हाती लागला आहे.

परत जाताच आतंकवादी कारवाया

ॲंटी टेरिरिस्ट स्कॉड (एटीएस) आणि इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) यांनी नूर मोहम्मदची चौकशी केली. त्याने ब्लॅंकेट विकण्यासाठी भारतात आल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे सुरक्षा एजन्सीने त्याला क्लीन चीट देत २३ जूनला रवानगी अफगाणिस्तानात केली. आठवडाभरात नूर मोहम्मद हा तालिबानी संघटनेशी जुळला आणि अफगाण सेनेच्या विरोधात शस्त्र घेऊन तयार झाला.

बनावट व्हिसा आणि पासपोर्ट

तालिबानी आणि नाटो सैन्य यांच्यात संघर्ष सुरू होता, त्यावेळी नूर मोहम्मदला गोळी लागली होती. त्यावेळी सैन्य भारी पडत असल्याने अफगाणिस्तानातील दलालांच्या मदतीने बनावट व्हिसा आणि पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर तो भारतात आला होता. थेट दीक्षाभूमी आणि संघभूमी असलेल्या शहरात तब्बल दहा वर्षे त्याने काढले होते.

९५ अफगाणी नागरिक

शहरात सध्यस्थितीत ९५ अफगाणी नागरिक शरणार्थी म्हणून वास्तव्यास आहेत. त्यापैकी सर्वाधिक अफगाणी हे गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सर्वाधिक अफगाणी ब्लँकेट व सुका मेवा विकण्याचा व्यवसाय करून नागपुरात उदरनिर्वाह करीत आहेत. अफगाणिस्तानमधील घडामोडीनंतर नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. नागपुरात शरणार्थी म्हणून राहणाऱ्या प्रत्येक अफगाणी नागरिकांच्या हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT