नागपूर

दुर्दैवी! बेड न मिळाल्यामुळे अर्ध्या वाटेतच शिक्षकाचा मृत्यू; नागपुरात सुविधांचा अभाव

सकाळ डिजिटल टीम

वानाडोंगरी (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रोजच कुठे ना कुठे रुग्ण दगावत आहेत. डिगडोह ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या पोलिसनगर येथील एका शिक्षकाचा बेड न मिळाल्यामुळे मेडिकलमध्ये नेत असतानाच विद्यापीठ ग्रंथालय चौकात वाहनामध्येच मृत्यू झाला.

नागपूरच्या सहकार्यनगर, वर्धा रोडवरील इंदिरा गांधी विद्यालय येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक हे हिंगणा तालुक्यातील डिगडोह ग्रामपंचायत अंतर्गत पोलिसनगर येथे स्वतःच्या घरी राहतात. हिंगणा तालुका महिला काँग्रेसच्या पदाधिकारी शालिनी मनोहर यांचे पती बाबाराव मनोहर यांची अचानक तब्बेत बिघडली. गांधीनगर येथील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात नेले. परंतु त्यांनी रुग्णाला मेडिकलमध्ये न्यायला सांगितले.

हेही वाचा - अभिमानास्पद! नागपूर जिल्ह्यातील येनिकोणी गावाला केंद्र शासनाचा 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर

गांधीनगरवरुन मेडिकलमध्ये नेत असतानाच विद्यापीठ ग्रंथालय चौकात रुग्ण दगावला. रुग्णाला प्राथमिक उपचार व बेड न मिळाल्यामुळे बाबाराव मनोहर या शिक्षकाचा वाटेतच मृत्यू झाला. मागील वर्षीसुद्धा कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपचाराअभावी चार ते पांच शिक्षकांचे मृत्यू झाले होते.

शिक्षकांना सुविधा नसल्याच्या तक्रारी

संपूर्ण नागपूर जिल्ह्यात कोरोनाकाळात विविध कामासाठी जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षकांना नियुक्त केले आहे. या कामात हयगय केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा-१८९७ ,आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ च्या कलमान्वये कार्यवाही करण्याचा धाक शिक्षकांना तहसीलदारांच्या मार्फत मिळणाऱ्या नियुक्तीपत्रात दाखवला जातो. कॉन्टॅक्ट-ट्रेसिंगचे काम करताना शिक्षक हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येतात. परंतु हे काम करण्यासाठी प्रशासनाकून नियुक्तीपत्राशिवाय दुसरे कुठलेच साहित्य मिळत नाही.

हेही वाचा - संचारबंदीतील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे टास्क फोर्सला आदेश

नियुक्तीपत्रात ज्याप्रमाणे कलम व कायद्याचा बडगा दाखवला जातो, तसाच बडगा कोरोनाबाधित शिक्षकांना प्राधान्याने उपचार मिळण्याबाबत मात्र दाखवला जात नाही. इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मात्र अशापद्धतीने वागवले जात नाही. शिक्षक हे निमुटपणे काम करतात व व्यवस्थित करतात. म्हणून शिक्षकांना सतत राबवून घेत असल्याच्या तक्रारी शिक्षक करतात. कोरोनाबाधित शिक्षकांना प्राधान्याने वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur: विठ्ठल मुर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; 23 व 24 तारखेला प्रक्रिया होणार

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

Weight Loss and Constant Fatigue: वजन कमी करण्याच्या नादात अशक्तपणा वाढतोय का? तज्ज्ञांनी सांगितले वॉर्निंग सिग्नल्स

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

SCROLL FOR NEXT